महाराष्ट्र
कजगाव येथील कुस्ती मल्ल दामू वाकोडे यांना मिळाले मानाचे बक्षीस
कजगाव ता, भडगाव (सतीश पाटील) येथील रहिवासी कुस्ती मल्ल दामू वाकडे यांनी कासोदा येथे कुस्तीगीर महासंघ बजरंग ग्रुपतर्फे भव्य कुस्तीची दंगल दि. ४ मार्च रोजी आयोजित करण्यात आली होती. तेथे कजगाव येथील दामू वाकोडे यांनी धुळ्याच्या पैलवानाला चित्त करत विजय मिळवला. मानाचे बक्षीस (गदा) मिळवून कजगाव गावाचे नाव जिल्ह्यात गाजवले आहे.
दामू पैलवान कजगाव येथे आले असता शिवसेना भडगाव तालुका संघटक अनिल महाजन, यांच्या वतीने फुल गुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला व पुढील वाटचालीच्या शुभेच्छा देण्यात आले. यावेळी अण्णा बोरसे, अशरफ खाटीक, आशिष वाणी, अक्षय मालचे, शाम सोनार, अभीलाष वाघ, इमरान मनीयार व सर्व पत्रकार बांधवतर्फे शुभेच्छा देण्यात आल्या.