बुलढाणा : (विशेष प्रतिनिधी) शिवसेना व शिंदे गटातील वाद देश भर चर्चेत असताना ह्या चर्चा थाम्बण्या ऐवजी आता जोरात सुरु आहे.मातोश्रीवर दर महिन्याला शंभर खोके जात असल्याचा खळबळजनक दावा, खासदार प्रतापराव जाधव यांनी करून राज्यात एकच खळबळ उडवून दिली आहे.गुलाबराव पाटील पहिल्यांदाच बुलढाणा जिल्ह्यात पालकमंत्री म्हणून आले असताना. यावेळी मेहकरमध्ये गुलाबराव पाटलांच रॅली काढून जोरदार स्वागत करण्यात आले. या कार्यक्रमावेळी शिंदे गटात गेलेल्या खासदार प्रतापराव जाधव यांनी थेट मातोश्रीवरच गंभीर आरोप केले आहे.प्रत्येक महिन्याला मातोश्रीवर 100 कोटी रुपये नेले जात होते. सचिन वाझे हेच मातोश्रीवर हे खोके घेऊन जात असल्याचा खळबळजनक दावा प्रतापराव जाधव यांनी केला आहे.
या विधानानंतर आता राज्यातील राजकारण पुन्हा एकदा तापतंय का? याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. आतापर्यंत शिंदे गटातील आमदारांना 50 खोके एकदम ओके म्हणून हिणवल्या जायचं. मात्र आता शिंदे गटात गेलेल्या खासदारांनी थेट मातोश्रीलाच “शंभर खोके एकदम ओके” तेही दर महिन्याला म्हणून आव्हान दिलं आहे. त्यावर आता शिवसेनेतून काय प्रतिक्रिया येते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.