स्वामी विवेकानंद वाचनालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी
बोरद (योगेश गोसावी) तळोदा तालुक्यातील खरवड येथे स्वामी विवेकानंद वाचनालयात डॉ बाबासाहेब आंबेडकरांची १३१ वी जयंती साजरी साजरी करण्यात आली. यावेळी प्रतिमेचे तसेच ग्रंथांचे पूजन करण्यात आले.
यावेळी प्राध्यापक अनिल गोसावी यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य मांडले त्यांनी सांगितले की,महाराष्ट्र हा शाहू,फुले, आंबेडकर या विचारांचा आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे महाराष्ट्र राज्याच्या जडणघडणीत महत्वाचं योगदान असून, बाबसाहेब आंबेडकरांनी एका जाती धर्माचा विचार न करता सर्वांना समान न्याय घटनेच्या माध्यमातून दिला आहे. ग्रंथालयात अनेक ग्रंथ उपलब्ध असून त्याचे वाचन करून बाबासाहेब आंबेडकराचे विचार आत्मसात केले पाहिजे. तसेच येणाऱ्या पिढीपर्यंत ते विचार पोहचवण्याची जबाबदारी आपली आहे,असे त्यांनी सांगितले.
यावेळी ग्रंथालयाचे अध्यक्ष सुनील गोसावी, ग्रंथपाल दीपक गोसावी, महेश गोसावी, गणेश जावरे, दीपक जाधव, पंडित जाधव, पत्रकार योगेश गोसावी सह ग्रामस्थ तसेच पोलिस कर्मचारी उपस्थित होते.