देश-विदेशब्रेकिंगविशेष

पेट्रोल-डिझेल आणखी स्वस्त ? पाहा आजचा भाव.

नवी दिल्ली: २१ जुलै २०२२ ब्यूरो रिपोर्ट

गेल्या काही दिवसांपासून जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत चढ-उतार होत आहेत. कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतींमुळे सरकारने बुधवारी पेट्रोल आणि डिझेलच्या निर्यातीवरील अतिरिक्त कर कमी केला. यानंतर देशांतर्गत बाजारातही तेलाच्या किमती कमी झाल्याचा अंदाज बांधला जात होता. पेट्रोल-डिझेलचे दर हे कच्च्या तेलाच्या दरांवर आधारभूत असतात.

कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ होऊनही सरकारी तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या किरकोळ दरात कोणताही बदल केलेला नाही. गुरुवारी जाहीर झालेले पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर आहेत. दिल्लीत अजूनही पेट्रोल ९६.७२ रुपये प्रतिलिटर मिळत आहे. ६ एप्रिलपासून कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ केलेली नाही.

आज सकाळी ब्रेंट क्रूडची किंमत प्रति बॅरल १०६.६ डॉलर इतकी होती. तर प्रति बॅरल १०२.३डॉलरवर विकली जात होती. विशेष बाब म्हणजे काही दिवसांपूर्वी क्रूडच्या किमती प्रति बॅरल १४० डॉलरच्या वर गेल्या होत्या. आता क्रूड १०० डॉलरच्या जवळ असताना, आगामी काळात पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर राहण्याची शक्यता आहे.

आजचे पेट्रोल-डिझेलचे दर.

जळगांव  – पेट्रोल १०७.५० रुपये प्रति लीटर आणि डिझेल ९४.०२ रुपये प्रति लीटर.

मुंबई – पेट्रोल १०६.३५ रुपये प्रति लीटर आणि डिझेल ९४.२८रुपये प्रति लीटर.

दिल्ली – पेट्रोल दर प्रतिलिटर ९६.७२ आणि डिझेलचा दर ८९.६२ इतका आहे.


चैन्नई – चेन्नईत पेट्रोल १०२.६३ रुपये प्रतिलिटर आणि डिझेल ९४.२४ रुपये प्रतिलिटर

कोलकाता – पेट्रोलचा दर प्रतिलिटर १०६.०३रुपये आणि डिझेल दर प्रतिलिटर ९२.७६रुपये.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Speed News Maharashtra

ह्या न्यूज पोर्टल च्या ब्यूरो चीफ ज्योतिबाला एस.एस. ह्या असून ब्युरो चीफ ( एच. आर.) पंकज सपकाळे हे आहेत सदर न्युज वेबपोर्टल हे मुबंई येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (मुबंई न्यायक्षेत्र) Mo. 9923149159

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे