महाराष्ट्र

शिंदखेडा येथील नगरसेवक विजयसिंह राजपूत यांच्या चारचाकी वाहनातून दीड लाखांची रोकड चोरी !

शिंदखेडा (यादवराव सावंत) शिंदखेडा येथील नगरपंचायतचे नगरसेवक तथा समाजवादी पार्टीचे जिल्हा अध्यक्ष विजयसिंह राजपुत यांच्या चार चाकी वाहनांचे नुकसान करुन वाहनात ठेवलेले रोख १ लाख ५० हजार रुपये पवन कोमलसिंग गिरासे यांनी चोरुन नेल्याची फिर्याद शिंदखेडा पोलीस स्टेशनला विजयसिंह नथेसिंह राजपुत यांनी दिली.

फिर्यादीत म्हटले आहे की, दि.१९ मार्च रोजी रात्री १०.३० वाजेच्या सुमारास घरी जेवण करुन झोपुन गेलो होतो. सकाळी ५.३० वाजता जाग आली असता बाहेर येऊन पाहिले असता दोन्ही गाड्यांचे काचा फुटलेल्या दिसल्या दोन्ही गाड्याचा आतिल बॉक्स उघडे दिसले. गाडीत ठेवलेले कागदपत्र अस्तव्यस्त पडलेले दिसले. अंबेसिटर क्रमांक एम एच १८ ए ९२२ या गाडीत ठेवलेले ५० हजार रुपये दिसले नाही तसेच किया सेल्टॉस एम एच १८बी.एच ०९२२ या गाडीच्या बॉक्स मध्ये ठेवलेले १ लाख रुपये दिसले नाही. तेव्हा घराच्या कम्पांउड मध्ये लावलेले सीसीटीव्ही केमेरे पाहीले असता सर्व कॅमेरे फुटलेले दिसले त्या आगोदरची शुटींग पाहीली असता सदर गल्लीत राहणारा इसम पवन कोमलसिंग राजपुत दिसत असुन त्याने फिर्यादीच्या संमतीशिवाय लबाडीच्या इराद्याने चोरुन दोन्ही चारचाकी वाहनांचे काच फोडुन व सिसिटीव्ही फोडुन नुकसान केले असल्याची फिर्याद दिली. याप्रकरणी पवन राजपुत याच्या विरोधात शिंदखेडा पोलीस स्टेशनला भादवि कलम ३७९,४२७ प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला असुन घटनेचा तपास पो.हे.कॉ आनंत पवार हे करीत आहे.

 

 

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Speed News Maharashtra

ह्या न्यूज पोर्टल च्या ब्यूरो चीफ ज्योतिबाला एस.एस. ह्या असून ब्युरो चीफ ( एच. आर.) पंकज सपकाळे हे आहेत सदर न्युज वेबपोर्टल हे मुबंई येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (मुबंई न्यायक्षेत्र) Mo. 9923149159

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे