शिवजयंतीचे श्रेय घेतंय कोण ?
दोंडाईचा (प्रतिनिधी) आपल्या दोंडाईचा शहराची शिवजयंती ही दरवर्षी शहरातील सर्वजण एकत्रित येऊन साजरा करीत असतात, दरवर्षी आपण अत्यंत उत्साहाने व एकतेने हा उत्सव साजरा करीत असतो.. या वर्षीही तसाच उत्सव संपन्न होईल.. राजपथावर नव्याने निर्माण झालेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळा विराजमान झाल्यावर पहिलीच शिवजयंती असून ती दोंडाईचा करांसाठी एक पर्वणीत ठरणार असल्याचे एक व्हिडिओ शेअर होत असून दोंडाईचाकरांचा अजून उत्साह वाढावा असा त्या व्हिडिओ चा हेतू आहे.. शिवरायांचे भव्य अश्वारूढ स्मारक आणि त्या भागात झालेले भगवेकरण व रोषणाई यामुळे शिवजयंती अभूतपूर्व होत असल्याचे दोंडाईचात वातावरण निर्माण झाले आहे.. यात शिवजयंतीत कुणाचेही श्रेय घेण्याचा काढीचाही संबध नाही.. परंतु काही राजकीय विरोधक मुद्दाम यात राजकारण आणत आहेत.. परंतु या व्हिडिओत शिवजयंतीच्या श्रेयाचा अवाक्षरही नाहीये..
खर म्हणजे जे लोक यात राजकारण आणून गैरसमज निर्माण करीत आहेत.. यांनी आतापर्यंत छत्रपती शिवरायांच्या नावाने केवळ आणि केवळ राजकारणच केले आहे.. शिवरायांचा अश्वारूढ पुतळा आम्ही बसवू असे त्यांनी अनेकदा सांगीतले परंतु ती धमक त्यांच्यात नव्हतीच.! शिवरायांचे नाव केवळ आणि केवळ राजकारणासाठीच वापरायचे आहे.. शिवरायांचे स्मारक आणि त्यामुळे शहराची शान ही नुसते दोंडाईचातच नाही तर संपूर्ण खानदेशात चर्चेचा विषय आहे.. संपूर्ण खानदेशात आपले दोंडाईचाचे कौतुक केले जात आहे.. परंतु ‘काही’ सडलेल्या मानसिकतेच्या लोकांना याची काहीही किंमत नाही.. त्यांना फक्त राजकारण करायचे आहे. ज्यांना जयकुमारभाऊच्या नावाची अलर्जी आहे अशी काही मंडळी विनाकारण गैरसमज निर्माण करीत आहेत.. त्यांच्याकडे कामही तेवढेच आहे.
आपल्या शहराची शिवजयंती ही सर्वच तरुणांनी एकत्र येवून साजरा होत असते आणि यंदाही होत असून या जयंतीचे खरे श्रेय हे त्या सर्व तरुणांचेच आहे. यात
वैयक्तिक कोणत्याही पक्षाच्या नेता, पदाधिकारी किंवा कार्यकर्त्यांचा काहीही संबध नाही.. खर म्हणजे शिवजयंती साजरा करणारा प्रत्येक जण हा आपल्या अंगातील राजकारण बाजूला करूनच या उत्साहात सहभागी असतो.. त्याच्यातील राजकारणाचा आणि या उत्सवाचा काडीमात्रही संबंध नाही.. ते फक्त आणि फक्त शिवप्रेमी म्हणूनच या उत्सवात असतात. त्यामुळे अश्या अफवांवर आजीबात विश्वास ठेवू नये.. अफवा पसरविणारे खरे शिवप्रेमी नाहीत. अश्या निरर्थक व विघ्नसंतोषी लोकांकडे लक्ष न देता शिवजयंती उत्साहात साजरा करावी ही सर्वांना विनंती.!
-एक शिवप्रेमी मावळा



