नवाब मलिक यांच्या अटकेचा राष्ट्रवादी काँग्रेसकडून जाहीर निषेध
सरकारी यंत्रणांचा चुकीच्या पद्धतीने वापर- रणजीत राजे भोसले
धुळे (प्रतिनिधी) राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ता तथा कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांना आकसापोटी ईडीने अटक केली. सदर घटनेचा धुळे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने निषेध व्यक्त करण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष रणजीत राजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीच्या शिष्ट मंडळाने जिल्हाधिकारी धुळे यांची भेट घेऊन निवेदन दिले.
निवेदनात भाजपा तथा केंद्र सरकार सरकारी यंत्रणेचा गैरवापर करीत आहे. ईडीचा दुरुपयोग करुन देशात चूकीचा पायंडा पाडत आहे. हे लोकशाहीसाठी घातक आहे. लोकशाही मार्गाने सत्तेवर आलेले महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी हा सर्व खटाटोप आहे. केंद्रातील भाजपा सरकार मनमानी कारभार व हुकूमशाही पध्दतीने, सूडबुध्दीने ईडीचा गैरवापर करीत आहे. केंद्राच्या अखत्यारीतील सरकारी यंत्रणांचा धाक दाखवून मंत्र्यांना व महा विकास आघाडीच्या नेत्यांना त्रास देण्याचे काम सुरू आहे.
या सर्व गोष्टींचा धुळे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी निषेध करीत आहे. ही हुकूमशाही खपवून घेतली जाणार नाही. हे असेच चालू राहिले तर पक्ष तीव्र स्वरुपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे. यावेळी रणजीत राजे भोसले, जोसेफ मलबारी, ज्ञानेश्वर माळी, कुणाल माळी, राजेंद्र सोलंकी, राजेंद्र चौधरी, राजेंद्र डोमाळे, जया सांळूखे, राज कोळी, प्रमोद सांळूखे, अमित शेख, एजाज शेख, हाशिम कुरेशी, जगन ताकटे, अस्लम खाटीक, सागर चौगुले, मयुर देवरे, प्रणव देसले, जितू पाटील, रोशन खाटीक, माजिद खाटीक, महेश भामरे, शकील खाटीक, अब्दूल कादीर, समीर शेख, अमिन पठाण, गुड्डू शेख, अश्पाक शेख, अजबाज शेख, अरशद शेख, असद खाटीक, अनिकेत माईनकर, आबिद मन्यार, पीर शाह, बरकत शाह आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्यने उपस्थित होते.