जळगाव जिल्हा

ह.भ.प.ज्ञानेश्वर महाराज जळकेकर यांच सर्व स्तरातुन कौतुक

जळगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील जळके येथील सचिन भिकन चिमनकारे हे घरची परिस्थिती हलाखीची असल्यामुळे कौटुंबिक उदरनिर्वाहासाठी दुबई येथे एका खाजगी कंपनीत आयटीआय पदवीवर कार्यरत होते. परंतु काही दिवस ओलांडल्यानंतर त्यांचे महाराष्ट्र राज्य विज विद्युत वितरण प्रा.ली.मध्ये विद्युत सहाय्यक या पदावर नेमणूक झाली परंतु ते दुबई येथे कार्यरत असलेल्या कंपनीने त्यांचा वीजा, पासपोर्ट व आवश्यक मुळ कागदपत्रे तीन महिन्यांच्या अटीवर जमा करून घेतले होते. परंतु त्यांची महावितरण मध्ये निवड झाल्याने त्यांना भारतात तात्काळ येणे फार गरजेचे होते.सचिन चिमनकारे यांनी कंपनी व्यवस्थापकांच्या खूप विनंत्या करून सुद्धा ते शक्य होत नव्हतं सचिन यांनी खूप प्रयत्न करून सुद्धा त्यांच काम कोनाकडूनच न होण्यासारखे झाले होते. मग पुढे सचिन यांनी आपल्या वडीलांमार्फत ह.भ.प.ज्ञानेश्वर महाराज पाटील जळकेकर यांना आपली अडचण सांगितली.

महाराजांनी क्षणाचाही विलंब न करता जळगाव लोकसभेचे खासदार उन्मेष पाटील यांची भेट घेतली व सचिनची परिपूर्ण माहिती दिली. त्यानंतर खासदार यांनी सुद्धा विलंब न करता केंद्रीय परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव यांच्याकडे मागणी लावून धरली व पाठपुरावा देखील केला त्यानंतर सचिन चिमनकारे यांची अवघ्या आठच दिवसात दुबई मधून सुटका केली व सचिन सुखरूप मायदेशी परतला. तो घरी आल्यानंतर कुटुंबियांचे आनंदाश्रू तरळत होते. ह्या अवघड अशा प्रवासामधून खासदार उन्मेष पाटील व ज्ञानेश्वर महाराज पाटील जळकेकर यांनी सचिनची सुटका केल्यामुळे त्यांचं गावपासून ते जिल्ह्यापर्यंत कौतुक होत आहे.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Speed News Maharashtra

ह्या न्यूज पोर्टल च्या ब्यूरो चीफ ज्योतिबाला एस.एस. ह्या असून ब्युरो चीफ ( एच. आर.) पंकज सपकाळे हे आहेत सदर न्युज वेबपोर्टल हे मुबंई येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (मुबंई न्यायक्षेत्र) Mo. 9923149159

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे