शाळा ही मंदिरा पेक्षा कमी नाही – अब्दुल सत्तार
सिल्लोड (विवेक महाजन) शाळा ही केवळ शिक्षण देणारी संस्था नसून विद्यार्थ्यांचे उज्वल भविष्य घडविणारे प्रमुख केंद्र असल्याने शाळा ही मंदिरा पेक्षा कमी नाही असे प्रतिपादन महसुल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी बडक वस्ती येथील जि. प. च्या पेव्हर ब्लॉकच्या लोकार्पण प्रसंगी केले. आपल्या गावात आदर्श शाळा निर्माण झाल्या पाहिजे यासाठी गावकऱ्यांसह शिक्षकांनी पुढाकार घेतला पाहिजे. जेणे करून आपल्या पाल्याचे उज्वल भविष्य घडेल असे मत देखील अब्दुल सत्तार यांनी यावेळी व्यक्त केले.
पळशी ता. सिल्लोड येथील बडक वस्ती येथील जि.प.च्या आदर्श शाळेच्या प्रांगणात सिल्लोड कृषी सेवा संघटनेच्या वतीने पेव्हर ब्लॉक बसविण्यात आले. राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सोमवार (दि.3) रोजी या पेव्हर ब्लॉक चे लोकार्पण राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्याहस्ते संपन्न झाले. यावेळी जि. प.चे माजी उपाध्यक्ष केशवराव तायडे, डॉ. मॅचिंद्र पाखरे, उपनगराध्यक्ष अब्दुल समीर, नॅशनल सुत गिरणीचे उपाध्यक्ष नरेंद्र ( बापू ) पाटील, संचालक राजेंद्र ठोंबरे, सतीश ताठे, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सुदर्शन अग्रवाल, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष दुर्गेश जैस्वाल, शंकर अग्रवाल, हनिफ मुलतानी, प्रवीण मिरकर, युवासेनेचे अक्षय मगर आदींची प्रमुख उपस्थिती होती.
बडक वस्ती येथील शाळेला जाण्यासाठी राजस्व अभियानातून रस्ता करून देवू यासाठी बडक वस्तीतील शेतकऱ्यांनी सहकार्य करण्याचे आवाहन राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी केले. बडक वस्तीतील आदर्श शाळेत गट संमेलन घ्यावे जेणे करून हा आदर्श घेवून इतर ठिकाणी आदर्श शाळा निर्माण होतील असे राज्यमंत्री अब्दुल सत्तार म्हणाले.
यावेळी चेअरमन विठ्ठल बडक, सदाशिव बडक, जाकेर बेग, रत्नाकर बडक, सर्जेराव बडक, संजय धुंदे, संतोष गव्हाणे, अप्पाराव बडक, नारायण बडक, संतोष गिल्डा, सुधाकर जाधव आदींची उपस्थिती होती.