महाराष्ट्रराजकीय
कोरोना केअर सेंटरचे पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते लोकार्पण
सिल्लोड (विवेक महाजन) राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या पुढाकाराने सिल्लोड शहरात उभारण्यात आलेल्या कोरोना केअर सेंटरचे लोकार्पण पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते रोजी संपन्न झाले.
कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी येथे महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र सुविधा असून येथे ऑक्सिजन प्लांट सह ईतर आरोग्याच्या सर्व सुविधा उपलब्ध आहेत. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी सदरील कोरोना केअर सेंटर मोलाची भूमिका निभावेल असे स्पष्ट करीत या रुग्णालयात उपचारासाठी दाखल झालेला रुग्ण ठणठणीत बरा होऊन घरी जाईल असा विश्वास पालकमंत्री सुभाष देसाई यांनी कोरोना केअर सेंटर च्या लोकार्पण प्रसंगी केले.