महाराष्ट्रराजकीय
भीमा कोरेगाव येथील विजयस्तंभाची प्रतिकृती तयार करून मानवंदना
सिल्लोड (विवेक महाजन) शहरातील स्नेहनगर भागातील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर भवन येथे भीमा कोरेगाव येथील 01/01/1818 रोजी विजय मिळविलेल्या शूरवीरांना शनिवार (दि.1) रोजी भीमा कोरेगाव येथील विजयस्तंभाची प्रतिकृती तयार करून त्यावर पुष्प अर्पण करून समता सैनिक दलाच्या मार्गदर्शनाखाली मानवंदना देण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपनगराध्यक्ष अब्दुल समीर होते तर कार्यक्रमास नगराध्यक्षा राजश्री निकम, नगरसेवक प्रशांत क्षीरसागर, सुधाकर पाटील, जितू आरके, पी जे हिवराळे, अशोक सुरडकर, प्रभाकर पारधे, बारकू आरके, विशाल बोराडे, संदीप पारखे, राजेश सुरडकर, अक्षय आरके, अमोल मगरे, अमरदीप साळवे, धम्मा पारखे, संकेत लोखंडे, नितीन सरोदे, अजय आरके,गुड्डू तौसिफ पठाण यांच्या सहित समता सैनिक दल, भारतीय बौद्ध महासभेचे पदाधिकारी तसेच उपासक आणि उपासिका उपस्थित होते.