७३ व्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने साने गुरुजी फाऊंडेशनतर्फे तंबाखूमुक्ती व व्यसनमुक्ती कार्यक्रम संपन्न
भोकरबारी (प्रतिनिधी) जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा भोकरबारी ता. पारोळा, जि जळगाव, या ठिकाणी ७३ व्या प्रजासत्ताक दिन निमित्ताने गावात सलाम मुंबई फाऊंडेशन, मुंबई, व साने गुरुजी फाऊंडेशन, अमळनेर जि जळगाव, जनमानवता संस्था चोपडा, जिल्हा प्रशासन, शिक्षण विभाग, आरोग्य विभाग, सामाजिक न्याय विभाग, पोलीस प्रशासन, यांचे संयुक्त विद्यमाने २६ जानेवारी रोजी सकाळी तंबाखू मुक्त शाळा व व्यसनमुक्ती बाबत मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी तंबाखू मुक्ती ची सामूहिक प्रतिज्ञा सर्व ग्रामस्थांना देण्यात आली. प्रातिज्ञेचे वाचन मुळे यांनी केले. या कार्यक्रमला सरपंच राहुल तुकाराम पाटील, उपसरपंच पूनम विश्वास गव्हाणे, ग्रामसेवक प्रवीण बापू अमृतकर, तलाठी योगेश बैसाने, सदस्य दीपक पाटील, युवराज सोनवणे, यशोदा पाटील, रंजनाबाई पाटील, मंगलबाई पाटील, शिक्षक व ग्रामस्थ साने गुरुजी फाऊंडेशनचे कार्यकते जगदिश पाटील, पवन साळुंखे आदी उपस्थित होते.