विनापरवानगी विरदेल गावाच्या सरपंच यांनीच केली जिवंत झाडांची कत्तल !
सरपंच व सदस्य, ग्रामसेवक यांच्यावर गुन्हा दाखल करा ; बौद्ध समाजाची पोलीस निरीक्षकांकडे मागणी
शिंदखेडा (यादवराव सावंत) ग्रामपंचायत ठराव न करता कोणत्याही यंत्रणेची परवानगी न घेता मनमानी कारभार करुन सरपंच सतिष गोटू बेहेरे व सदस्य, ग्रामसेवक यांनी तब्बल ८ झाड़े जमिनदोस्त केली आहे. त्यामुळे सरपंच व सदस्य, ग्रामसेवक यांच्यावर गुन्हा दाखल करा, अशी मागणी शिंदखेडा पोलीस निरीक्षक यांच्याकडे सर्व समाजबांधव विरदेल यांनी आज रोजी निवेदनातून केली आहे.
शिंदखेडा तालुक्यातील विरदेल येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरमध्ये बौद्ध समाजाची स्मशानभुमि गेल्या १०० वर्ष पासुन अस्तित्वात आहे. तिथे समाजबांधव यांनी ६०/७० निंबाची झाडे लावुन आज तागायत त्यांची जतन हा समाज करत आहे. सरपंच सतिष गोटू बेहेरे त्यांचे बंधू शामकांत बेहेरे, ग्रामसेवक व सर्व सदस्य यांनी संगन मताने कोणताही ही ग्रामपंचायत ठराव न करता कोणत्याही यंत्रणेची परवानगी न घेता मनमानी कारभार करुन तब्बल ८ झाड़े जमिनदोस्त केली आहेत. समाजाची लोक बोलायला गेले असता त्यांना अरेरावी करत तुमच्या ने जे होईल ते आमचे करुन घ्या..आम्ही सत्ताधारी आहोत आम्हाला जिथे पटेल तिथे आम्ही काम करु. असा सत्तेचा माज असलेल्या सत्ताधारींना महाराष्ट्र वृक्ष संरक्षण आणि सवर्धंन नियम २००९ अधिसूचना मधिल कलम 21 (1)व 2 नुसार विनापरवानगी वृक्षतोड करणाण्यांवर अदखल पात्र गुन्हा नोदवा. अन्यथा जिल्हा स्तरावर जनआदोलंन करण्यात येईल यास सर्वस्वी जबाबदार संबधीत यंत्रणा व प्रशासन राहील, अशी मागणी शिंदखेडा पोलीस निरीक्षक यांच्याकडे सर्व समाजबांधव विरदेल यांनी आज रोजी निवेदनातून केली.