महाराष्ट्र
लज्योश्री संस्थेचे अध्यक्ष तथा दिग्दर्शक अशोराज तायडे यांच्याकडून शहीद भगतसिंग युवा सेनेच्या युवकांना स्पर्धा परीक्षेचे पुस्तके भेट
बोदवड (सतिष बावस्कर) तालुक्यातील येवती येथील शहीद भगतसिंग युवा सेनेच्या युवकांना स्पर्धा परीक्षेचे पुस्तक भेट लज्योश्री संस्थेचे अध्यक्ष तथा दिग्दर्शक अशोराज तायडे यांच्या कडून देण्यात आले.
यावेळी अशोराज तायडे यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विध्यार्थ्यांशी चर्चा केली व भविष्यात अजून काही गरज भासल्यास मदत करण्याचे आश्वासन दिले व युवकांना त्यांच्या उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्यात, यावेळी युवकांनी आभार माणलेत व सरांनी दिलेले पुस्तके खूपच मार्गदर्शक असल्याच्या भावना व्यक्त केल्यात.