महाराष्ट्र
शिंदखेडा येथे वकील संघाच्या अध्यक्षपदी अॅड.वसंतराव पवार तर उपाध्यक्ष अॅड.बी.झेड.मराठे यांची बिनविरोध निवड
शिंदखेडा (यादवराव सावंत) येथील शासकीय विश्रागृहात झालेल्या शिंदखेडा वकील संघ पदाधिकारी निवडीची सभा अॅड.अशोकभाई गुजराथी यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. त्यात शिंदखेडा तालुका वकील संघाच्या अध्यक्षपदी अॅड.वसंतराव पवार व उपाध्यक्ष पदी अॅड.बी.झेड.मराठे यांची तर सेक्रेटरी म्हणून अॅड.वसंत पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली. याप्रसंगी जेष्ठ विधीतज्ञ अॅड.अशोकभाई गुजराथी, अॅड.विनोद पाटील , अॅड.अरविंदकुमार मंगासे , अॅड.मिलिंद सोनवणे ,अॅड.हर्षल अहिरराव, अॅड. जाधव , अॅड.महिरे ,अॅड.बोरसे , आदी सह वकील संघाचे सदस्य उपस्थित होते.