महाराष्ट्र
मोताळा तालुक्यातील १२ गावांचे आत्याधूनिक पद्धतीने ‘ड्रोन’द्वारे सर्वेक्षण
मोताळा (संभाजी गवळी) मोताळा तालुक्यातील दाभाडी तळणी पिंपळपाटी घुसर बु घुसर खुर्द शेलापुर तालखेड माळपिंपरी डिडोळा भोरटेक इत्यादी गावांचे अत्याधुनिक पद्धतीने ड्रोनद्वारे सर्वेक्षण करण्यात आले.
हे सर्वेक्षण सर्वे ऑफ इंडियामार्फत पूर्ण महाराष्ट्रभर अभियान चालू आहे. तरी काही दिवसांमध्ये पूर्ण मोताळा तालुक्याचे सर्वेक्षण होणार आहे. तरी या बारा गावाचे सर्व सर्वेक्षण आज करण्यात आले. सर्वेक्षण करतेवेळी तालुका भूमि अभिलेख उपाध्यक्ष पाटील, अंभोरे, घुगे, आढाव, बढे, पंचक्रोशीतील संतोष गवळी, निलेश घाटे, लहु खराटे आदी उपस्थित होते.



