फळबाग अनुदानासाठी शेतकऱ्यांचे अर्धनग्न आमरण उपोषण, जगाच्या पोशिंदाला भेटण्यासाठी अधिकाऱ्यांना लागले दोन दिवस.
सोयगाव (जि.औरंगाबाद) : विवेक महाजन
सोयगाव : तहसीलदार वकृषीच्या टोलवाटोलवी जगाच्या पोशिंद्यांचे मंगळवार पासून सुरू असलेले आमरण उपोषणकर्ते आक्रमक होत अर्धनग्न उपोषण सुरु केल्याने अखेर बुधवारी रात्री उशिरातहसीलदार यांच्या लेखी आश्वासनानंतर सोडण्यात आले.प्रत्यक्षात फळबागा लागवड असतांना कोरडवाहूच्यानुकसानीचा निकष धरून सोयगावातील शेतकऱ्यांना अतिवृष्टीत चक्क फळबागाच्याअतिवृष्टीच्या नुकसानीतून वगळून कोरडवाहूचा निकष लावून नुकसानीची भरपाई दिल्याचाखळबळजनक प्रकार उघडकीस आल्याने संतप्त ३० ते ३५ शेतकऱ्यांनी मंगळवारी महसूल आणिकृषीच्या विरुद्ध तहसिल कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरु केले होते. तहसीलदार यांनी उपोषण कर्त्या जगाच्यापोशिंद्यांकडे पाठफिरवीत प्रतिनिधींना पाठविल्याने शेतकरी व प्रतिनिधी यांच्यातचर्चा होतहोती मात्र प्रतिनिधी असल्याने ठोस निर्णय न घेता माघारी फिरल्यानेजगाच्या पोशिंद्यांचा प्रशासनाच्या चालढकल पणामुळे उपोषणाचा मुक्काम वाढला होता.उपोषण स्थळी अनेक राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी भेटी दिल्या मात्र तहसीलदारयांनी दुसऱ्या दिवशीही उपोषण कर्त्या शेतकऱ्यांची भेट न घेतल्याने वातावरण चांगलेचतापले होते. तहसीलदार शेतकऱ्यांची थट्टा करीत भेटण्यास टाळाटाळ करीत असल्यानेसंतप्त शेतकऱ्यांनी सायंकाळपासून अर्धनग्न उपोषण केल्याने प्रशासन खडबडून जागेझाले. तहसीलदार यांनी रात्री उपोषण कर्त्या शेतकऱ्यांशी चर्चा केली. संबंधित कर्मचाऱ्यांचीचौकशी करून दोषी आढळणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचे तोंडी आश्वासन दिले. मात्रशेतकरी लेखी आश्वासन मागीत होते तर तहसीलदार लेखी लिहून देण्यास तयार नव्हते तरशेतकरी लेखी आश्वासन द्यावे यावर ठाम असल्याने काही काळ तणाव निर्माण होत शेतकरी व तहसीलदार यांच्यात शाब्दिक चकमकीघडल्या होत्या. अखेर काहींनी मद्यस्थिकेल्याने तहसिल प्रशासनांकडून लेखी आश्वासनानंतर उपोषण सोडण्यात आले. उपोषणासाठीदत्तात्रय ढगे, तुळशीरामचौधरी, विनोदसोहणी, सुनिलकाळे, सुनिलरोकडे, शांतारामतेंलग्रे, चंद्रासरोकडे, अनिलसोहणी, बाबुरावसोनवणे, भगवानगाडेकर, हर्षलरोकडे, सुखदेवरोकडे, आदींसह शेतकरीआमरण उपोषणाला बसलेले होते. यावेळी शेतकऱ्यांना दोन दिवस उपोषणास बसावे लागल्याने उपोषणकर्तेव शेतकरी यांनी प्रशासनावर नाराजी व्यक्त करीत फळबाग शेतकरी यांना योग्य न्यायमिळाला नाही तर तीव्र स्वरुपात आंदोलन करण्यात येईल असे मत व्यक्त होत होते.छायाचित्र ओळ :- शेतकऱ्यांना लेखी आश्वासनदेतांना तहसीलदार रमेश जसवंत व शेतकरी तर दुसऱ्या छायाचित्रात अर्धनग्न उपोषण करतांना शेतकरी.