आ.सौ.ज्योतीताई रंगनाथरावजी काळे यांचा कै.बाबुरावजी काळे स्कूल मध्ये वाढदिवस उत्साहात साजरा
सोयगाव (जि.औरंगाबाद) : विवेक महाजन
सोयगाव : आ.सौ.ज्योतीताई रंगनाथरावजी काळे यांचा कै.बाबुरावजी काळे स्कूल मध्ये वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला. शिवज्योती शिक्षण संस्था औरंगाबाद संचलित आ.सौ.ज्योतीताई काळे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. वाढदिवसानिमित्त शाळेत निबंध स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यावेळी शाळेतील एकुण ४८विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता यात रांगोळी स्पर्धेचे निकाल परीक्षक संत ज्ञानेश्वर महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.डॉ.शिरीष पवार सर.प्रा.डॉ. परिहार, प्रा.डॉ चोपडे प्रा.डॉ. शिंदे सर यांनी विद्यार्थांचे निकाल घोषित केले. या रांगोळी स्पर्धेचे पहिला, द्वितीय, तत्तीय क्रमांक काढण्यात आला त्यात त्यांना पारीतोषिक देण्यात आले.व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी संत ज्ञानेश्वर महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ शिरीष पवार, प्रा.डॉ शिंदे, प्रा डॉ.परिहार, प्रा.डॉ.चोपडे सर प्रा.डॉ. दादासाहेब पवार शाळेचे श्री कोलते सर , ज्ञानेश्वर एलीस, शितल काटोले, मनिषा पाटील, अंजली कथलकर, योगेश काळे, आशा गणगे, मुश्ताक शहा ,संजय डापके आदी उपस्थित होते.