शिंदखेडा येथील साबरहटी भिलाटी ऐवजी विर बिरसा मुंडा नगर होण्याची मागणी नगरपंचायत ला आदिवासी एकता परिषदेचे निवेदन
अशिक्षित पणा दुर व्हावा आदिवासी समाजाला विर महापुरुषाचा सन्मान मिळावा हाच हेतु-तालुका उपसचिव भुपेंद्र देवरे
शिंदखेडा प्रतिनिधी यादवराव सावंत
धुळे : जिल्हयातील शिंदखेडा येथील माळीवाडा रोडवरील आदिवासी समाज मोठय़ा प्रमाणावर रहिवास करून राहत आहेत.पुर्वीपासुन साबरहटी हे नाव दिले आहे.नुकत्याच शासन निर्णय नुसार जातीनिहाय नगर वस्तीचे नामकरण करण्यात यावे व त्याजागी थोर महापुरुष स्वातंत्र सेनानी शहीद जवानांच्या नावे नगरात रुपांतर करावे असे आवाहन केले आहे.त्यानुसार आज साबरहटी भिलाटी येथील रहिवासी यांनी आदिवासी एकता परिषदेच्या माध्यमातून नगरपंचायत चे मुख्याधिकारी प्रशांत बिडगर यांना निवेदन सादर केले.सदर निवेदनातून साबरहटी भिलाटी ऐवजी विर बिरसा मुंडा नगर व्हावे अशी मागणी करण्यात आली.हयावेळी पुर्वीपासुन बहुसंख्य आदिवासी वस्ती रहिवास करुन राहते म्हणून पुर्वजांनी साबरहटी भिलाटी नाव ठेवले.परंतु अशिक्षित पणा असल्याने तो दुर व्हायला हवा म्हणून आमचे दैवत विर बिरसा मुंडा हयांचे नाव सर्व समाजातील लोकांनी ठरवले आहे म्हणून हया नगरीस विर बिरसा मुंडा नगर देण्यात यावे अशी मागणी आम्ही समाजाच्या वतीने करित आहोत. असे हयाप्रसंगी उपसचिव भुपेंद्र देवरे यांनी सांगितले.हयावेळी तालुका सचिव गुलाब सोनवणे, सल्लागार शानाभाऊ सोनवणे, जिभाऊ फुले .दिनेश सोनवणे,नाना कुवर , गुड्या सोनवणे,देविदास सोनवणे, गोकुळ सोनवणे , निर्मल गायकवाड यासह समाजातील बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.