महाराष्ट्र
बळीराजावर अवकाळी संकट ; गारपीटसह वादळी पाऊस
सटाणा (संभाजी सावंत) हवामान खात्याकडून वर्तविण्यात आलेल्या अंदाजानुसार सोमवारी सायंकाळच्या सुमारास नाशिक जिल्ह्यात सटाणा तालुक्यातील काही ठिकाणी गारपीट सह पाऊस पडल्याने शेतकरी वर्गावर मोठे संकट उभे झाले आहे.
१० मार्च पर्यंत महाराष्ट्रासह गुजरात राजस्थान, मध्य प्रदेश आदी राज्यात वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तविली गेली आहे. सटाणा तालुक्यातील नामपूर श्रीपुरवडेसह बऱ्याच गारपीट सह पाऊस पडला. त्यामुळे हा अवकाळी पाऊस कधी थांबणार असा प्रश्न शेतकरी वर्गासमोर आहे.