वीज तोड थांबवावी! दौंडचे माजी आ. रमेश थोरात यांची पवार यांच्या दरबारी तोडगा काढण्याची मागणी
दौंड (गौरव दिवेकर) दौंड तालुक्यातील अनेक गावात गेल्या काही दिवसापासून उद्भवलेल्या विजेच्या प्रश्नाच्या संदर्भात आज देशाचे नेते शरदचंद्र पवार यांची ‘मोदीबाग पुणे’ येथे भेट घेऊन सविस्तर चर्चा केली.
सद्या सर्वत्र कडक उन्हाळ्याचे दिवस सुरू झाले असल्याने उन्हाची तीव्रता देखील अधिक जोमाने वाढत आहे. त्यातच गेल्या काही दिवसांपासून तालुक्यात विजेचा प्रश्न गंभीर बनला असून, तालुक्यातील पिके देखील करपुन धोक्यात आली आहेत. अनेक दिवसापासून पिकांना पाणी मिळत नसल्याने तालुक्यातील विविध गावातील शेतकऱ्यांमधून नाराजीच्या प्रतिक्रिया येत आहे. पिके वाचण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू असल्याची माहिती शरदचंद्र पवार यांना यावेळी दिली.
राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, ऊर्जा मंत्री आणि संबंधित खात्याचे सचिव तसेच महाविकास आघाडीतील इतर नेत्यांच्या समवेत पुढील दोन दिवसात विजेच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी एकत्रित बैठक घेऊन योग्य तो निर्णय घेण्यात येईल अशी माहिती पवार यांनी या भेटी दरम्यान दिली. यावेळी दौंड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष आप्पासाहेब पवार उपस्थित होते.



