
यावल प्रतिनिधी (अलाउद्दीन तडवी):- सविस्तर वृत्त असे की सूत्राद्वारे मिळालेल्या माहितीनुसार यावल येथील एसबीआय शाखेत खाते असलेल्या वयोवृद्ध,अपंग,विधवा आणि इतर खातेधारकांना सहन करावा लागतोय नाहक त्रास. शाखेत ग्राहक गेले असता त्यांना नीट उत्तर मिळत नसून उडवा उडवी ची उत्तरे स्टेट बँक कर्मचाऱ्यांकडून मिळतात. जर एखादा खातेदार कंटाळून बँक मॅनेजर पर्यंत पोहचलाच तर बँकेचे मॅनेजर “विजय टाले” हे ग्राहकाला बोलतात की “तुम्ही बँकेत गोंधळ घालत आहेत पोलिसात जमा करतो तुम्हाला” अशा प्रकारचे उत्तर गोरगरीब जनतेला मिळत असल्याचे खातेदार ग्राहकांकडून कळते .
एखादा खातेदार सकाळी आठ वाजेपासून बँकेच्या बाहेर नंबर लावून उभा असतो आणि जेव्हा बँक उघडते तेव्हा तो आपले नंबरखिडकीजवळ लावतो त्यावेळेस त्याच्यासोबत घडते की जर खाते धारकाला 2000,3000,5000 रुपये विड्रॉल करायचे असतील किंवा डिपॉझिट करायचे असतील तर ते विड्रॉल करून दिले जात नाहीत. तर त्या खातेधारकाला उत्तर मिळते की तुम्ही ही रक्कम बाहेरून काढा मिनी बँकेतून ही रक्कम भेटेल येथे आम्ही देऊ शकत नाही. मॅनेजरच्या आदेश आहेत. वयोवृद्ध व्यक्ति न देखील अशाच प्रकारची वागणूक बँक देत आहे.बँक मॅनेजर विजय टाले आणि कर्मचारी हे बँकेत मनमानी करभार करीत असल्याचे बोलले जात आहे. जिल्हा प्रशासन ह्याकडे लक्ष देईल असा हि सवाल उपस्थित होत आहे.