अतिवृष्टी बाधितांसाठी २९ कोटींच्या निधी मंजूर
धुळे (विक्की आहिरे) धुळे तालुक्यात सप्टेंबर २०२१ मध्ये अतिवृष्टी झाली होती. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई मिळावी यासाठी आमदार कुणाल पाटील यांनी पाठपुरावा केला. त्यानुसार धुळे तालुक्यातील बाधित शेतकऱ्यांसाठी २९ कोटी २१ लाख ८० हजार रुपये अनुदान मंजूर झाले आहे.
भरपाई लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाईल, अशी माहिती आमदार कुणाल पाटील यांनी दिली. जिल्ह्यासह धुळे तालुक्यात ५ ते १३ सप्टेंबर दरम्यान अतिवृष्टी झाली होती. त्याचा फटका शेतकऱ्यांना बसला. त्यानंतर आमदार कुणाल तालुक्यातील भरपाई पाटील यांनी पंचनामा करुन नुकसानीचा अहवाल शासनास सादर करण्याच्या सूचना दिल्या होत्या. धुळे शेतकऱ्यांना नुकसान मिळावी म्हणून आमदार पाटील यांनी सरकारकडे पाठपुरावा केला होता. मदत व पुनवर्सन मंत्री विजय वडेट्टीवार यांची भेट घेतली. त्यानंतर धुळे तालुक्यातील २२७ शेतकऱ्यांसाठी २९ कोटी २१ ४७ हजार लाख ८० हजार रुपये मंजूर झाले आहे. मदत बाधित शेतकऱ्यांना तत्काळ वाटप करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित यंत्रणेला दिल्या असल्याची माहिती आमदार कुणाल पाटील यांनी दिली. निधी मंजूर झाल्याने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.