महाराष्ट्र
येवती ग्रामपंचायतीकडून शिवजयंती उत्साहात साजरी
येवती (सतीश बावस्कर) येवती ग्रुप ग्रामपंचायतीच्या वतीने ग्रामपंचायतीच्या वतीने शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन शांताराम भाऊ वाघ सरपंच यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी सरपंच शांताराम वाघ, गजानन सावरी, पगार कडू सुकाळे, सुदाम निळे, अशोक पगार, विनोद शिंदे, सागर शेगडे, दिगंबर माळी, पंडित वाघ, पप्पू माळी, संदीप सुकाळे, बाबा ठाकूर, संदीप महाजन, रवींद्र जयस्वाल, समाधान फाटके, कडू सुकाळे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा ग्रामपंचायतीला भेट दिली. ग्रामपंचायत कर्मचारी ग्रामस्थ उपस्थित होते.



