जामनेर तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा ; वाकी खुर्द ग्रामपंचायतीला सरपंच परिषद मुंबईचा राज्यस्तरीय आदर्श
ग्रामपंचायत पुरस्कार सरपंच सुधाकर सुरवाडेंसह, उपसरपंच पुनम ढाकरे यांच्यासह सर्व सदस्यांना हिवरे बाजार येथे मान्यवरांच्या हस्ते प्रदान
जामनेर (ईश्वर चौधरी) महाराष्ट्र राज्य सरपंच परिषद मुंबई यांच्या वतीने देण्यात येणारा मानाचा राज्यस्तरीय आदर्श ग्रामपंचायत पुरस्कार जामनेर तालुक्यातील वाकी खुर्द ग्रामपंचायतीला आज हिवरेबाजार जि.अहमदनगर येथे आज मोठ्या थाटामाटात मान्यवरांच्या हस्ते लोकनियुक्त सरपंच सुधाकर सुरवाडे आणी उपससंच पुनम योगेश ढाकरे व सर्व ग्रामपंचायत सदस्य यांना प्रदान करण्यात आला.
महाराष्ट्र राज्य सरपंच परिषद मुंबईच्या वतीने या पुरस्कारा साठी ग्रामपंचायतीने केलेल्या विकासाचे गावातील एकतेचे तटस्थपणे मुल्यमापन करून जळगांव जिल्ह्यातील तीन ग्रामपंचायतींना राज्यस्तरीय आदर्श ग्रामपंचायत पुरस्कार देण्यात आले. यामधे जामनेर तालुक्यातील एकमेव वाकी खु.ग्रामपंचायतीचा समावेश आहे.
माजी जलसंपदा मंत्री आ. गिरीष महाजन यांच्या मार्गदर्शनानुसार वाकी खु.गावाचे प्रथम लोकनियुक्त सरपंच सुधाकर गंगाराम सुरवाडे व सर्व ग्रा.पं सदस्य, ग्रामसेवक, तथा समस्त गावकऱ्यांच्या सहकार्याने गावात झालेल्या विकास कामाची दखल ग्रा.प. परिषद महाराष्ट्र राज्यच्या वतीने घेण्यात आली त्यामुळे आदर्श सरपंच व आदर्श ग्रामपंचायत पुरस्कार वाकी खुर्द गावाला आज प्रदान करण्यात आला आहे.
आदर्श ग्रामपंचायत पुरस्काराचे वितरण दि.२२ एप्रिल शुक्रवार रोजी हिवरे बाजार जि .अहमदनगर येथे पार पडला पुरस्कार स्वीकारण्या साठी वाकी खुर्द चे लोकनियुक्त सरपंच सुधाकर सुरवाड़े, उपसरपंच पूनम योगेश ढाकरे, सदस्य कविता संदीप झलवार, आरती शिवजी तेली, राधा विनोद सरताळे, ईश्वर बाबूलाल तेली, अंबादास जगन नरवाड़े, बापू लक्ष्मण पाटिल हे सदस्य उपस्थित होते. माजी जलसंपदा मंत्री आ.गिरीशभाऊ महाजन यांनी वाकी खु.ग्रामस्थांचे अभिनंदन केले आहे.