महिला दिनानिमित्त सोमवारी धुळ्यात तेली समाजाचा भव्य महिला मेळावा
धुळे (प्रतिनिधी) महिला दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा तेली समाज महिला आघाडीच्या वतीने सोमवार दि. ७ मार्च रोजी दुपारी ४ वाजता धुळ्यात तेली समाजाचा भव्य महिला मेळावाचे दाता सरकार मंगल कार्यालय, वाखारकर नगर, आझाद नगर, धुळे येथे आयोजन करण्यात आले आहे.यावेळी नारी सन्मान हा कार्यक्रम ठेवण्यात आला असून मेळाव्यास येणाऱ्या सर्व तेली समाज महिला भगिनींना भेटवस्तूचे वाटप करण्यात येणार आहे.
प्रमुख अतिथी म्हणून पुष्पाताई बोरसे(ठाणे), विद्याताई करपे(राहूरी) नाशिक विभाग अध्यक्ष, माजी महापौर जयश्रीताई अहिरराव, नगरसेविका प्रतिभा ताई चौधरी, सुमनताई महाले, भारती अहिरराव, ज्योत्स्ना थोरात, रत्नमाला चौधरी, धरती देवरे, लक्ष्मी ताई बागुल, पुष्पा ताई बोरसे (धुळे), कल्पना काकू महाले, मंगला ताई चौधरी, अॅड शुभांगी पाटील, मनिषा महाले, कविता ताई चौधरी, भाग्यश्री राणा, मीना करनकाळ, संध्या ताई चौधरी, मालती चौधरी, लीना करनकाळ, भारती महाले, आरती महाले, किर्ती ताई महाले, वंदना थोरात, शोभना बागुल, निलम करनकाळ, कल्पना ताई चौधरी, मालु ताई चौधरी, छाया करनकाळ, ज्योती चौधरी, वैशाली चौधरी यांच्यासह प्रमुख मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तरी कार्यक्रमास तेली समाज महिला भगिनींनी मोठ्या संंख्येने उपस्थित रहावे असे आवाहन महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा तेली समाज महिला आघाडी धुळे जिल्हा उपाध्यक्ष छाया करनकाळ, शहराध्यक्ष ज्योति चौधरी, नलिनी करनकाळ, छाया चौधरी, उपाध्यक्षा शोभा थोरात, संघटक माया चौधरी, सहसचिव दिपाली चौधरी, प्रसिद्धी प्रमुख कविता चौधरी, देवपुर उपाध्यक्षा वर्षा चौधरी, प्रियंका चौधरी, सचिव अलका चौधरी, उपाध्यक्षा सोनाली चौधरी, उपाध्यक्षा मनिषा चौधरी, सहसंघटक आशा चौधरी, कोषाध्यक्ष सरोज चौधरी, संपर्क प्रमुख कल्पना चौधरी, सदस्या वर्षा चौधरी, वैशाली चौधरी यांनी केले आहे.