शिंदखेडा येथे शहादा तालुक्यातील विविध पदाच्या भिल समाज विकास मंचतर्फे नियुक्त्या जाहीर
शिंदखेडा (यादवराव सावंत) येथील भिल समाज विकास मंच च्या वतीने शहादा तालुक्यातील विविध पदांची नियुक्तया संस्थापक अध्यक्ष दिपक अहिरे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. सदर नियुक्ती केल्याचे भिल समाज विकास ची नंदुरबार जिल्ह्य़ात एन्ट्री झाली आहे. आज आयोजित केलेल्या भिल समाज विकास मंचची बैठक संपन्न झाली.
या बैठकीचे अध्यक्षस्थानी संस्थापक अध्यक्ष दिपक अहिरे हे होते. यावेळी संमेलनाविषयी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.त्यानंतर शहादा तालुक्यातील प्रमुख कार्यकर्ते यांनी भिल समाज विकास मंचमध्ये प्रवेश केला. त्यातुन शहादा तालुकाध्यक्षपदी राजु सोनवणे (बामखेडा), उपाध्यक्षपदी रविंद्र दशरथ ठाकरे (कमखेडा), कार्याध्यक्षपदी नारसिंग ठाणसिंग ठाकरे (भुलाणे), युवा उपाध्यक्षपदी आकाश देवचंद सोनवणे (गोगापुर) यांची निवड सर्वानुमते करून संस्थापक अध्यक्ष दिपच अहिरे यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देऊन स्वागत केले.ह= याप्रसंगी मंचचे उपाध्यक्ष बापुजी फुले, खजिनदार राजेश मालचे, गणेश सोनवणे, शामा ठाकरे, सुनील सोनवणे, संजय मोरे, कालु मोरे, किरण चित्ते, शहादा तालुक्यातील बळीराम निकुम, गोरख पवार, विनोद वाघ, गोविंद मोरे, रामलाल ठाकरे आदीसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.