जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कर्ज वितरण सोहळ्यास उपस्थित राहण्याचे राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांचे अवाहन
सिल्लोड : औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीने जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना राज्याचे नगरविकास मंत्री ना. एकनाथजी शिंदे यांच्या हस्ते कर्ज वितरण करण्यात येणार आहे. रविवार दिनांक 15 मे रोजी दुपारी 12 वाजता औरंगाबाद येथील सांस्कृतिक क्रीडा मंडळ मैदान येथे हा कर्ज वितरण सोहळा संपन्न होणार आहे.
सदरील कर्ज वितरण सोहळ्याच्या पूर्व तयारी बाबत राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या अध्यक्षतेखाली सिल्लोड येथे प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आढावा बैठक संपन्न झाली. राज्यात पहिल्यांदा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून हा नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येत असून या प्रसंगी नगरविकास मंत्री ना. एकनाथजी शिंदे उपस्थितांना मार्गदर्शन करणार असल्याने जिल्ह्यसह सिल्लोड – सोयगाव मतदार संघातील अंगणवाडी सेविका, मदतनीस यांच्यासह शिवसेना, युवासेना तसेच महिला आघाडीच्या पदाधिकारी, सदस्य तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी केले आहे.
या बैठकीस जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अर्जुन पा. गाढे, माजी जि.प. उपाध्यक्ष केशवराव तायडे, युवानेते तथा उपनगराध्यक्ष अब्दुल समीर, शिवसेना तालुकाप्रमुख देविदास पा. लोखंडे, नगराध्यक्षा श्रीमती राजश्री निकम, शिवसेना उपजिल्हाप्रमुख किशोर अग्रवाल, पं. स.सभापती संजय जामकर, उपसभापती काकासाहेब राकडे, शिवसेना शहरप्रमुख रघुनाथ घरमोडे, खरेदी विक्री संघाचे रमेश साळवे, अशोक सूर्यवंशी, कृउबा समितीचे संचालक दामूअण्णा गव्हाणे , नॅशनल सुत गिरणीचे संचालक राजेंद्र ठोंबरे, मारुती वराडे, नगरसेविका शंकतलाबाई बन्सोड, शिवसेना महिला आघाडीच्या तालुकाप्रमुख दीपाली भवर, नगरसेवक शंकरराव खांडवे, विठ्ठल सपकाळ, मनोज झंवर, शेख बाबर, प्रशांत क्षीरसागर, जुम्मा खा पठाण, सुधाकर पाटील, आसिफ बागवान, सुनील दुधे, मतीन देशमुख, राजू गौर, जितू आरके, बबलू पठाण, अजिंठाचे सरपंच नजीर अहेमद, माजी सरपंच अब्दुल अजीज, सिल्लोड सोसायटीचे चेअरमन राजेंद्र बन्सोड, युवासेनेचे पदाधिकारी शेख इम्रान (गुड्डू), कुणाल सहारे, प्रवीण मिरकर, संतोष खैरनार, रवी गायकवाड, संजय मुरकुटे,बापू काकडे, फहिम पठाण, दीपक अग्रवाल, महेश पाटील, संजय फरकाडे, राजुमिया देशमुख, अमोल कुदळ, शिवाजी दाभाडे, भावराव दुधे, कैलास इंगे, जीवन सोनवणे, आदी पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.