महाराष्ट्र
दहेगाव येथील मुंबई नागपूर हायवेचे काम सुरु
वैजापूर (गहिनीनाथ वाघ) तालुक्यातील दहेगाव येथील अनेक वर्षापासून प्रलंबित असलेला मुंबई नागपूर हायवे चे काम शेतकऱ्यांच्या अडचणी असल्यामुळे या हवेची फार दुर्दशा झाली होती व अपघाताचे प्रमाणही वाढलं होतं जसे काय शेळ फाटा ते दहेगाव धुळीचे साम्राज्य झाले होते. पण, आता मुंबई नागपूर हायवेचे काम चालू करण्यात आले. प्रोजेक्ट मॅनेजर चेतन बोंद्रे यांनी आज मजुरांना सांगितले की, या कामांमध्ये कुठल्याही प्रकारचा बोगस पणा किंवा हलगर्जीपणा होता कामा नये अशी मजुरांना बजावणी केली आहे.