जुन्या वैमनस्यातून तरुणाचा खून शहरात मोठी खळबळ – संशयित पोलिसांचा ताब्यात.
जलगांव येथील घटना अवघ्या ७ दिवसात दूसरा खून.
दिनांक: २४ जुलै २०२२ जळगांव प्रतिनिधि
जळगांव:शहरात अवघ्या ७ दिवसात दूसरा खून झाल्याने जळगांव शहरात मोठी खळबळ उडाली आहे.रिक्शा चालक दिनेश काशीनाथ भोई (व.२९) असे मृताचे नाव असुन आपसी वैमनस्यातून खून झाल्याची माहिती मिळाली आहे.
या बाबत सवित्तर वृत्त असे कि, जळगांव येथील हरिविठ्ठल नगर भागात राहणारा दिनेश काशीनाथ भोई (व.२९) रिक्शा चालक हा रात्रि ९ वा. सुमारास जेवण झाल्यानंतर घराबाहेर रसत्याचा बाजूला बसलेला होता. त्याच वेळी विठ्ठल नामक संशयिताने मागून येत दिनेशच्या डोक्यात लोखंडी राॅड ने जोरदार वार केले, यात तो गंभीर जख्मी होऊन रक्ताचा थारोळ्यात खाली पडला.त्याला तातळीने जिल्हारुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र उपचारा दरम्यान त्याचा मृत्यु झाला.घटनेची माहिती मिळताच एल सी बी चे पोलिस निरिक्षक किरणकुमार बकाले यांचा मार्गदर्शनाखाली पथकाने घटणास्थळी धाव घेतली. संशयित विठ्ठल एका ठिकाणी लपल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती त्या आधारावर एल सी बी चे पोलिस निरिक्षक किरण कुमार बकाले यांच्या मार्गदनाखाली पथकातील प्रीतम पाटील,अक्रम शेख,विजय पाटील,सुधाकर अंभोरे यांनी एका संशयिताला ताब्यात घेतले असुन त्याचे नाव विठ्ठल माऊली हटकर असे आहे व एका जुन्या वादाचे वैमनस्यातून त्याने सदर घटनेला अंजाम दिल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.सदर घटनेने हरिविठ्ठलनगरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे .