छत्रपतींचा पूर्णाकृती पुतळा उभारल्या शिवाय स्वस्थ बसणार नाही !
नियोजित जागेवर शिव प्रतिमा पूजन प्रसंगी विनोद सोनवणे यांचा निर्धार
भुसावळ (अरुण तायडे) शहरातील बहुचर्चित आणि बहु प्रतिक्षित अश्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी आज ‘वंचित’तर्फे शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्र नव्हे तर भारतभर त्यांच्या सर्वधर्म समभाव, सहिष्णुता आणि जन कल्याणासाठी ओळखले जातात. ज्यांनी आपल्या ‘गनिमी काव्याने’ रयतेचे राज्य निर्माण केले. उभा महाराष्ट्र ज्यांच्यावर अक्षरशः जीव ओवाळून टाकतो. “लाख मेले तरी चालतील पण लाखोंचा पोशिंदा जगाला पाहिजे ” अशी भावना जन सामन्यात निर्माण झाली अश्या महान राज्याच्या पुतळ्याचा प्रश्न गेली पंधरा वीस वर्षे भिजत ठेवत पूर्णाकृती पुतळा ‘ वंचित ‘ ठेवला गेला आहे.शहरात पंधरा वीस वर्षात नवीन बगीचे, उद्यान निर्माण केले गेले मात्र छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा उभारला गेला नाही हे विशेष.
वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणे यांनी रयतेच्या राज्याच्या पूर्णाकृती पुतळा उभारला जावा म्हणून सतत पाठपुरावा सुरू केला. बाजार पेठ पो स्टे जवळील प्रस्तावित जागेवर शिवरायाचा भव्य पुतळा उभारला गेला पाहिजे अशी पालकमंत्र्यांच्या ताफा अडवून मागणी केली होती.
आज सदर जागेवर वंचीतचे जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणे व पोलिस निरीक्षक राहुल गायकवाड यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केले. सदर कार्यक्रमास जिल्हा महासचिव दिनेश इखारे, महीला आघाडी जिल्हाध्यक्षा वंदनाताई सोनवणे, जिल्हा महासचिव वंदनाताई आराक,कामगार सरचिटणीस बालाजी पठाडे, भुसावळ शहराध्यक्ष गणेश जाधव, शहर महासचिव देवदत्त मकासरे मेजर, जिल्हा उपाध्यक्ष आशाताई सोनवणे,बंटी सोनवणे,निलेश जाधव, जिल्हा संघटक अरुण तायडे,महीला आघाडी जिल्हा संघटक शोभाताई सोनवणे,तालुका सचिव गणेश इंगळे, रुपेश कुऱ्हाडे, सुनिल ठाकूर, भुसावळ शहर उपाध्यक्ष अतुल पाटील,सुनील पाटिल, सागर खरात, जिल्हा उपाध्यक्षा मीराताई वानखेडे, मीनाताई भालेराव, संगीताताई तायडे, भारतीताई इंगळे,कुणाल सुरडकर, विजय मालविय आदी उपस्थित होते.
सदर कार्यक्रमास मराठा समाज अध्यक्ष किरण पाटिल, संविधान आर्मीचे जगनभाई सोनवणे, भीम आर्मी भा ए मि जिल्हाध्यक्ष गणेश सपकाळे, राकेश बग्गन, एड.तुषार पाटिल,मा.प्रभारी नगराध्यक्ष युवराज लोणारी, मा.प्रभारी नगराध्यक्ष राजू नाटकर, माजी नगरसेवक ललित मराठे, भरत परदेशी, छावाचे कृष्णा शिंदे, संजय शिंदे ,भीम आर्मी सं र द जिल्हाध्यक्ष श्रीकांत वानखेडे, शिवसेनेचे शहर प्रमुख निलेश महाजन, सोनी ठाकूर, महेन्द्र पाटिल आदी सह राजकीय ,सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी भेटी देवून महाराजांच्या पुतळ्याचा प्रश्न हाती घेतल्या बद्दल कौतुक केले.