महाराष्ट्र
येवती येथील जि.प.प्राथमिक शाळेत प्रजासत्ताक दिन साजरा
येवती, ता.बोदवड (सतिश बाविस्कर) येथील जि.प.प्राथमिक शाळा येथे भारतीय प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आला. ध्वजारोहण रामदास श्रावणे यांचे हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी शाळेत शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष सोनाली माळी, समिती सदस्य, सरपंच, ग्रा.प. सदस्य, गावातील समस्त नागरिक व सर्व शिक्षकवृंद उपस्थित होते. सद्यस्थितीत कोरोना प्रतिबंध असल्याने विद्यार्थ्यांविना प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरी केली गेला.