दोंडाईचा शहर मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ पत्रकार दिलीप जाधव यांची तर सचिवपदी नरेंद्र ठाकूर यांची एकमताने निवड
दोंडाईचा (प्रतिनिधी) येथील दोंडाईचा शहर मराठी पत्रकार संघाची वार्षिक बैठक दोंडाईचा येथील शासकीय विश्रामगृहात अध्यक्ष जितेंद्र गिरासे अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आले होते. यावेळी मागील वर्षाच्या आढावा घेण्यात आला. यावेळी सर्वानुमते संघाची नूतन कार्यकारणी जाहीर करण्यात आली. संघाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ पत्रकार दिलीप तुकाराम जाधव त सचिवपदी नरेंद्र ठाकूर उपाध्यक्ष रणजीत राजपूत यांची एकमताने निवड करण्यात आली.
यावेळी ज्येष्ठ सल्लागार म्हणून जे. पी. गिरासे, राजेश ईशी, हितेन्द्र माहले, यांची तर सदस्यपदी आर. डी. चौधरी, दिलीप शेळके, जितेंद्र गिरासे, बळीराम पाटील निवड करण्यात आली. तात्कालिन अध्यक्ष जीतेंद्रसिह गिरासे यांनी नवनियुक्त अध्यक्ष दिलीप जाधव यांच्याकडे पदभार सोपविण्यात आला. तसेच दोंडाईचा शहर पत्रकार संघाच्या वतीने शिक्षक म्हणून निवृत्त झालेले पत्रकार संघाचे सदस्य आर.डी. चौधरी सेवानिवृत्तीच्या सत्कार समारंभ करण्यात आला.