शिवजयंती निमित्ताने चांदगडभुरक्षीच्या दुर्लक्षित पडीक किल्याला भेट
चांदगड (गोपाल कोळी) वीरांगना झलकारी बाई कोळी संस्था व वाल्या सेना गृप च्या वतीने शिंदखेडा तालुक्यातील चांदगडभुरक्षी या अतिदुर्गम आदीवासी टोकरे कोळींच्या गावात छत्रपति शिवाजी महाराज यांची जयंती साजरा करण्यात आली.
यावेळी गावातील महर्षि वाल्मीकि ऋषि वाचनालय साठी पुस्तके ही भेट देण्यात आली यावेळी कार्यक्रम साठी उपस्थित समाज सेवी सौ गीतांजली कोळी यांनी शिवजयंती निमित्त उपस्थितांना मार्गदर्शन केले. तसेच चांदगडभुरक्षी गावाजवळील पुरातत्व विभागाला माहीतही नसलेल्या चांदगड या नष्ट झालेल्या किल्याची व प्राचीन विहीर गावकरींच्या मदतीने सौ गीतांजली कोळी यांनी पाहणी करून चांदगड गावातील या पडझड झालेल्या किल्याची निगाराखण्याचे सांगून जवळच असलेली प्राचीन विहीर साफसफाई करून तिचे शिवजयंतीच्या निमित्ताने संगोपन करा असे आवाहन केले.
गड किल्ले इतिहासाचे साठी आहेत… आदीवासी टोकरे कोळी जमातीचा राजा किंवा किल्लेदार या किल्याचा अधिपति होता त्यामुळे या किल्याजवळ तीनशे चारशे कुटुंबाचे गाँव हे अतिप्राचीन काळापासून बसलेले आहे अतिशय दुर्गम भाग असल्याने कोणत्या ही प्रकारच्या आदीवासींसाठी सुविधा येथे राबवलेल्या येथे दिसत नाही. शिवजयंतीच्या निमित्ताने या ऐतिहासिक वारसा परंतु अनेक वर्षापासून येथील वारसा जपण्याचा प्रयत्न आज शिवजयंतीच्या निमित्ताने करण्याचा प्रयत्न केला आणि आजची शिवजयंती सामाजिक क्षेत्रात कार्यरत असतांना सार्थक सार्थक झाल्यासारखे वाटले. या साठी गावातील आदीवासी टोकरे कोळी बांधव वाल्या सेना गृप शिंदखेडा तालुका अध्यक्ष हिरालाल कोळी, विलास कोळी, आकाश कोळी यांच्या सह अनेक बांधवांनी सहकार्य केले.