चिंचपाडा येथे डोंगऱ्यादेव सोंगे स्पर्धा मोठ्या उत्साहात
चिंचपाडा (प्रतिनिधी) बोदगांव ता.साक्री येथे आदिवासी शिक्षण सेवा प्रतिष्ठान परिवार मार्फत डोंगऱ्यादेवाच्या सोंगेनृत्य मनोरंजनात्मक स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडल्या. आदिवासी सोंग कलावंत मोठ्या उत्साहाने सहभागी झालेत. यावेळी परिसरातील नवापाडा, कालदर, चिंचपाडा, बोदगांव, ढोंगसागाळी, वाघाळे व पळसून गावातील कलावंत सहभाग नोंदवला. भवानीमातेच्या दर्शनाने सोंगे स्पर्धला सुरुवात झाली.
शिकार करणे, आंधळ्या- बहिऱ्या, देवमोगरा माता, लहान मुल संगोपन नवस, मासेमारी, न्हावी केसहेअर सेन्टर, वाडा वडिल पुजन, युवक व्यसन, सरपंच कारभार व सागाळी येथील सामुहिक नृत्य नंदी, नारदमुनी, शंकरजी महाराज, पाराबती, हनुमान, मोर, शबरी माता असे उत्कृष्ट वेशभूषेत सोंगेचा देवखळीत आदिवासी संस्कृतीचे सोंगेरुपी दर्शन घडवत संपूर्ण महाराष्ट्रात आदिवासी संस्कृतीचे आदर्श अद्याप कायम ठेवली आहे.
आदिवासी शिक्षण सेवा प्रतिष्ठान परिवार अशा आदिवासी उत्कृष्ट कलावंतांना बक्षीस देवून प्रोत्साहित केले. प्रथम क्रमांक शिकार करणे सावन गांगुर्डे नवापाडा. द्वितीय क्रमांक मासेमारी चुनिलाल महाले कालदर, तृतीय क्रमांक युवक व्यसन दिपक गावीत वाघाळे तर उत्तेजनार्थ व्यसन अनिल भोये चिंचपाडा व डोंगऱ्यादेव तुकाराम कोकणी पळसून ह्या सोग्यांचे कौतूक करण्यात आले.
चिंचपाडा परिसरातील धुळे व नंदुरबार जिल्ह्यातून सोंगे दर्शन घेणेसाठी मोठ्या संख्येने आदिवासी बांधव उपस्थित होते. नाशिक जिल्ह्याहून आप. रावण चौरे, कवी रमेश भोये व प्रतिष्ठान परिवार, आदिवासी बचाव अभियान मंडळ, सर्व आदिवासी समाज बांधवांचे संघटना, घरधनी माऊली, भोपा, पावरकर, कतकरी, टापरा यांचे मार्गदर्शन लाभले. सर्व मावल्या, सरपंच, ग्रामस्थ, प्रतिष्ठित नागरिक गावकरी, महिला, लहान थोर मंडळी सहभागी झाले आणि डोंगऱ्यादेवास नमन करुण कार्यक्रमाची सांगता केली.