शुभांगी पाटील यांनी नवनिर्वाचित शिक्षण उप-संचालक चव्हाण यांची घेतली भेट
पहिल्याच भेटीत नाशिक विभागातील समस्यांबाबत केले अवगत
नाशिक (प्रतिनिधी) महाराष्ट्र टीचर्स असोसिएशनच्या राज्याध्यक्ष शुभांगी पाटील यांनी आज नाशिक विभागाचे नवनिर्वाचित शिक्षण उप-संचालक चव्हाण यांची भेट घेत त्यांना नाशिक विभागातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व संस्थाचालक यांच्या समस्यांबाबत अवगत करविले.
यामध्ये सर्वप्रथम विभागातील अघोषित, प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा व नैसर्गिक वाढीच्या वर्ग व तुकड्या यांच्या त्रूटी पूर्ततेसाठी व हरकती बाबत सुनावणी दि. ९ डिसेंबर रोजी पुणे येथे संचालक कार्यालयात कॅम्पचे आयोजन केले होते. या कॅम्पला विभागातून असंख्य शिक्षक, कर्मचारी व संस्था चालक यांच्या सोबत मी स्वतः उपस्थित होते. परंतु त्यादिवशी आपल्या कार्यालयाकडून व धुळे वगळता जिल्हा पातळीवरून देखिल कोणीही जबाबदार अधिकारी उपस्थित नव्हते. त्यामुळे सदर सुनावणी ही आज ठेवण्यात आली आहे. त्यामुळे उध्या तरी संबंधित जिल्ह्यांचे अधिकारी यांच्यासह शिक्षण उप-संचालक कार्यालयातून जबाबदार अधिकाऱ्यांना पुणे संचालक कार्यालयात उपस्थित ठेवण्याची मागणी शुभांगी पाटील यांनी केली.
तसेच 100%अनुदानित, व अंशतः अनुदान तसेच सेवानिवृत्त कर्मचारी यांचे प्रलंबित विवीध बिले ज्यामध्ये पी एफ, मेडिकल बिले, पेन्शन बिले इ साठी आवश्यक असलेला बिडीएस उपलब्ध करून द्यावी अशी मागणी केली. तसेच शिक्षकांच्या शालार्थ आई डी व सेवा सातत्य चे प्रलंबित प्रकरणे तात्काळ मंजूर करण्याची मागणी केली. त्याचबरोबर शिक्षकांच्या व कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नांबाबत चर्चा केली व प्रश्न मार्गी लावावे.