महाराष्ट्र

हस्ती बँकेच्या संचालक मंडळाची निवडणूक बिनविरोध !

दोंडाईचा (प्रतिनिधी) वि.प्र. महाराष्ट्रात सर्वोत्कृष्ट बँक म्हणून लौकिक प्राप्त ‘दि हस्ती को ऑप. बँकेची’ संचालक मंडळाची निवडणूक नुकतीच बिनविरोध पार पडली. यात बँकेचे संपूर्ण संचालक मंडळ हे सन २०२१ ते २०२६ करिता बिनविरोध निवडून आलेले आहे.

हस्ती बँकेचे सन २०२०-२१ हे सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे. यात बँकेच्या संचालक मंडळाची निवडणूक सभासदांनी पार पाडून बिनविरोध संचालक मंडळ निवडणुकीची परंपरा गेल्या अनेक वर्षापासून कायम ठेवली आहे. बँकेचे अध्यक्ष कैलास कांतीलाल जैन व संचालक मंडळाने बँकेच्या सर्व सन्माननीय सभासद बंधू भगिनींनी बिनविरोध संचालक मंडळ निवडून दिल्याबद्दल आभार व्यक्त केले आहेत.

बँकेचे संस्थापक व प्रथम अध्यक्ष स्व. हस्तीमलजी भोमराजजी जैन यांनी बँक स्थापनेच्या वेळी आखून दिलेली ध्येय धोरणे, व्यवहारातील पारदर्शकता व सर्वसामान्यांची सेवा या मुल्यांची जोपासना सातत्याने करून; बँकेचे मार्गदर्शक व आधारस्तंभ आदरणीय स्व. कांतीलालजी जैन यांनी बँकेच्या कार्याचा विस्तार संपूर्ण महाराष्ट्रात आपल्या २१ शाखांद्वारा करून बँकेच्या लहानशा रोपट्याचे वट वृक्षात रूपांतर केले आहे. आणि हिच परंपरा बँकेचे विद्यमान अध्यक्ष कैलास जैन, संचालक मंडळ व बोर्ड ऑफ मॅनेजमेंट चेअरमन किशोर जैन व सदस्य यांनी पुढे नेत सर्व सामान्य सभासदांचा बँकेच्याप्रती असलेला विश्वास कायम राखलेला आहे.

नवनिर्वाचित संचालक मंडळात – पहलाज तखतमल माखिजा, मदनलाल शांतीलाल जैन, कैलास कांतीलाल जैन, दिलीप आनंदभाई वाघेला, डॉ. दिलीप केशरमल चोरडीया, संजय नेमीचंद दुग्गड, जितेंद्र गोरख पाटिल, पांडुरंग गोविंद कागणे, विजय जिजाबराव पाटिल, दिनेश रजनीकांत वोरा, मधुबाला प्रदिप जैन, मंजुषा बाळकृष्ण पाटिल, अक्षय बंसीकुमार छाजेड, अमित नरेंद्रकुमार चोपडा, वासुदेव मोतीराम पाटिल हे सदस्य नवनिर्वाचित झाले आहेत.

संपूर्ण नाशिक विभागीय क्षेत्रात हस्ती बँकेने आपल्या कार्याचा विशेष असा ठसा उमटविलेला आहे. अद्ययावत तंत्रज्ञानाद्वारे सर्व प्रकारच्या डिजिटल पेमेंट सेवा आपल्या खातेदार ग्राहकांना उपलब्ध करून दिल्या आहेत. आजतगायत राज्य व राष्ट्रीय पातळीवर हस्ती बँकेस उत्कृष्ट बँकेचे सुमारे ३८ पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. आज बँकेचा एकुण व्यवसाय १४०० कोटीच्या वर असून; आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि उत्तम व्यवस्थापन असलेली बँक याबाबत रिजर्व बँकेचे असलेले निकष हस्ती बँकेने सातत्याने पूर्ण केलेले आहेत.

सोबतच बँकेने आपल्या स्थापनेपासून सतत ऑडिट ‘अ’ वर्ग तथा निव्वळ नफा मिळविला आहे. त्याचप्रमाणे सभासदांना सुरूवातीपासूनच डिव्हिडंटचे वाटप केलेले आहे. व त्यापैकी सुमारे २० वर्षापासून १५% डिव्हिडंट देणारी महाराष्ट्रातील एकमेव बँक आहे. तसेच कर्जावरील व्याजदर राष्ट्रीयकृत व खाजगी बँकांच्या तुलनेत माफक दरात आहेत. बँकेचा सीआरएआर रिजर्व बँकेच्या नियमाप्रमाणे किमान ९% अपेक्षित आहे; तथापी बँकेने ते २०% च्या वर राखलेले आहे. तर नेट एनपीए प्रमाण गेल्या ८ वर्षापासून ०% ठेवण्यात बँक यशस्वी झालेली आहे. तसेच प्रधानमंत्री जीवन बीमा योजनेचा व प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ बँकेने कर्जदार व सभासदांना मिळवून दिलेला आहे. अशा प्रकारे हस्ती बँकेने गेल्या ५० वर्षातील आपला प्रगतीचा आलेख सातत्याने उंचावत ठेवलेला आहे. सदर निवडणूकीचे कामकाज निवडणूक निर्णय अधिकारी म्हणुन अभिजित देशपांडे, सहाय्यक अधिकारी म्हणून मनोज चौधरी, संजय गिते, शेखर साळी यांनी पाहिले.

सभासद, खातेदार ग्राहकांना बँकेने दिलेल्या पारदर्शी, निरपेक्ष व सर्वोत्कृष्ट सेवेची मिळालेली पावतीच

“हस्ती बँक संचालक मंडळाची बिनविरोध निवडणूक ही बँकेचे सन्माननीय सभासद, खातेदार ग्राहक यांना बँकेने दिलेल्या पारदर्शी, निरपेक्ष व सर्वोत्कृष्ट सेवेची मिळालेली पावतीच आहे व सतत बिनविरोध निवडणूक अशी महाराष्ट्रातील एकमेव बँक म्हटल्यास वावगे ठरणार नाही. बँकेचे संस्थापक स्व. हस्तीमलजी जैन, बँकेच्या प्रगतीचे शिल्पकार स्व. कांतीलालजी जैन, सर्व संचालक मंडळ त्यांना प्रत्येक सामाजिक कामासाठी पाठिंबा देणारे त्यांचे जेष्ठ बंधू स्व. शांतीलालजी जैन यांनी दिलेल्या आदर्श मुल्यांची जोपासना करून बँक संचालक मंडळाने बँकेचे ट्रस्टी म्हणून बँकेचे कामकाज सर्व केलेले आहे. यात सर्व अधिकारी व कर्मचारी यांच्या मौल्यवान सहभाग आहे, त्यांचेही आभार व्यक्त करतो. तसेच सभासदांनी ठेवलेला विश्वास सदैव अतूट राहील, असा विश्वास मी संचालक मंडळाच्या वतीने सर्व सभासद व खातेदारांना देऊ इच्छितो.

मदनभाऊ जैन – जेष्ठ व सुविद्य संचालक हस्ती बँक

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Speed News Maharashtra

ह्या न्यूज पोर्टल च्या ब्यूरो चीफ ज्योतिबाला एस.एस. ह्या असून ब्युरो चीफ ( एच. आर.) पंकज सपकाळे हे आहेत सदर न्युज वेबपोर्टल हे मुबंई येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (मुबंई न्यायक्षेत्र) Mo. 9923149159

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे