
यवतमाळ : (जिल्हा प्रतिनिधी) यवतमाळ जिल्हातील मेट ता. उमरखेड येथील तरुण अमोल सुरेश जाधव वय 32 हे शेतात औषध फवारणी करत असताना फवारणीचे औषध त्यांच्या शरीरात गेल्या मुळे त्यांना अस्वस्थ वाटू लागले.त्यानंतर त्यांना दवाखान्यात हलवण्यात आले. मात्र डॉक्टराना त्यांना वाचवण्यात अपयश आले. त्यांच्या पशच्यात आई, पत्नी दोन मुल, लहान भाऊ असा परिवार आहे. त्यांच्या जाण्याना परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. शासन स्तरावर ह्या गोष्टीची दखल घेतली जाऊन त्यांच्या कुटूंबास शासना कडून मदत मिळावी अशी भावना परिसरातील नागरिक व्यक्त केली जात आहे.