नाशिकमहाराष्ट्र
जमनवाडी येथे मार्गदर्शन करत ग्रामसेवक व सरपंच यांनी केले वृक्षरोपण.
जमनवाडी:दि.०९जुलै२०२२
प्रतिनिधि-गहिनीनाथवाघ: झाडांचा आपल्या जीवनाशी खूप जवळचा संबंध आहे आपल्याला मिळणारा प्राणवायू म्हणजेच ऑक्सिजन हा झाडांपासूनच मिळतो झाडांची निर्मिती आणि निसर्गचक्र यांचे खूप जवळचे नाते आहेे, एखादे बीज रुजवले की त्याचे रोप बनतेरोपाची वाढ व्यवस्थित होण्यासाठी त्याला सुयोग्य आणि पाणी अशा घटकांची आवश्यकता असतेे.
झाडे आपल्याला आवश्यक असलेला ऑक्सिजन वायू देतात आणि सजीवांनी सोडलेला कार्बन डायऑक्साइड ते स्वतः शोषून, परत ऑक्सिजन बाहेर सोडतात निसर्गचक्रात शुध्द हवेची असलेली कमतरता झाडे भरुन काढत असतात मनुष्यालाच तेवढं नाही तर पृथ्वीवरील सर्व जीवांना जगवण्यासाठी वृक्ष महत्वाची भूमिका बजावत असतात हे मार्गदर्शन करून जमन वाडी येथे ग्रामसेवक व सरपंच तसेच ग्रामस्थांच्या वतीने जमानवाढीमध्ये वृक्षारोपण करण्यात आले.