जळगाव जिल्हाब्रेकिंगमहाराष्ट्र
Trending
शहरातील रेल्वे पुलाखालील मुख्य जलवाहिनी फुटल्याने हजारो लिटर पाणीची नासाळी.
दिनांक-१० जुलै २०२२
प्रतिनिधि-अखिलेशकुमार धिमान
भुसावळ : शहरातील रेल्वे पुलाखालील मुख्य जलवाहिनी फुटल्याने हजारो लिटर पाणी वाहत असून २५ फूट कारंजा उडत आहे. नगरपरिषदेची रेल्वे पुला खालील पाण्याची मुख्य जलवाहिनी गेल्या तीन तासांने फुटल्याने हजारो लिटर पाणी वाहत आहे.तसेच येणारे जाणारे वाहन चालक फुटलेल्या जलवाहिनीच्या पाण्यापासून आपला बचाव करण्यासाठी वेगाने वाहन चालवीत असल्याने अपघातही होत आहे. प्रशासनाने लवकरात लवकर फुटलेल्या जलवाहिनीला बंद करण्याची मागणी सुज्ञ नागरिकांकडून होत आहे.