महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटनेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त भव्य रक्तदान शिबिर
साक्री (प्रतिनिधी) महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटनेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन श्री छत्रपती अग्रसेन महाराज विद्यामंदीर साक्री रोड धुळे येथे करण्यात आले होते. शिबीराचे उद्घाटन श्री छत्रपती अग्रसेन महाराज विद्यामंदीर माध्य. मुख्याध्यापक नानाभाऊ वाघ व प्रा. मुख्याध्यापक दिनेश मोरे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज प्रतिमेला माल्यार्पण करून करण्यात आले.
संघटनेच्या वतीने केलेल्या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला व चाळीस जणांनी रक्तदान केले. अनेकांना आणखी रक्तदान करावयाचे होते परंतु काही तांत्रिक अडचणींमुळे रक्तदान करु शकले नाही. रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी संघटनेचे जिल्हाध्यक्ष भुपेश वाघ, सरचिटणीस ऋषिकेश कापडे, कार्याध्यक्ष प्रशांत महाले, विभागीय अध्यक्ष प्रभाकर चौधरी, विभागीय सचिव रवींद्र देवरे, जिल्हा कोषाध्यक्ष न्हानू माळी, प्रमुख संघटक कमलेश चव्हाण, जिल्हा उपाध्यक्ष कैलाश सोनवणे, जिल्हा संघटक खुशाल चित्ते, संजय ठाकूर, जेष्ठ सल्लागार विजय निकुंभे, राज्य महिला कोषाध्यक्षा रुखमा पाटील, महिला जिल्हाध्यक्षा दिपा मोरे, महिला सरचिटणीस प्रतिभा वाघ, कार्याध्यक्षा सुरेखा बोरसे, महिला कोषाध्यक्ष रंजना राठोड, महिला उपाध्यक्ष वैशाली बच्छाव, तालुका अध्यक्ष हनुमानदास बैरागी, तालुका सरचिटणीस डॉ. भागवत चौधरी, तालुका कार्याध्यक्ष मनोज परदेशी, तालुका उपाध्यक्ष किशोर देवकर, प्रविण शिरसाठ, संजय अमृतकर, शिंदखेडा तालुका कोषाध्यक्ष गोविंद वाघ, धुळे महिला तालुका अध्यक्ष सुमन साळूंके, तालुका महिला सरचिटणीस भारती भदाणे, रत्ना महाले, महानगर अध्यक्ष विजय अग्रवाल, महानगर सरचिटणीस ललित वाघ, कार्याध्यक्ष डॉ आशुतोष वसईकर, राजेंद्र परदेशी, प्रा.डाॅ.सुदाम राठोड, जे.डि.पाटील, गिरधर देवरे यांच्या सहित पुरोगामी शिक्षक संघटनेचे सर्व सन्माननीय पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले.