शिंदखेडा येथे तालुकास्तरीय भव्य व्यावसायिक विक्री प्रदर्शनाचे माजी आमदार रामकृष्ण पाटील यांच्या हस्ते उद्घाटन
शिंदखेडा (यादवराव सावंत) येथील जनता हायस्कूलच्या प्रांगणात आयोजित तालुकास्तरीय भव्य व्यावसायिक विक्री प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.सदर प्रदर्शनाचे उद्घाटन माजी आमदार रामकृष्ण तात्या पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. प्रदर्शनाचे आयोजन महिला बचत गटाच्या माध्यमातून प्रथमच चैतन्य संस्था राजगुरुनगर प्रेरित नक्षत्र ग्रामीण महिला स्वयंसिद्ध संघाच्या वतीने केले होते.
तालुक्यातील सुमारे पाचशे हुन अधिक बचत गटाच्या महिला सहभागी झाल्या होत्या. सुरुवातीला व्यावसायिक विक्री प्रदर्शनाचे उद्घाटन माजी आमदार रामकृष्ण पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. ह्यावेळी तालुक्यातील महिलांचे संघटन व सक्षमीकरण आणि स्वयंसहाय्यता गटाच्या माध्यमातून होत असताना एकमेकांच्या देवाणघेवाणातुन व उद्योग व्यवसाय करुन उदरनिर्वाह करण्यासाठी महिंद्रा अँड महिंद्रा व चैतन्य संस्था राजगुरुनगर पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण महिला सक्षमीकरण आणि पतपुरवठा कार्यक्रम अंतर्गत चैतन्य संस्था राजगुरुनगर प्रेरित नक्षत्र ग्रामीण महिला स्वयंसिद्ध संघाच्या वतीने भव्य व्यावसायिक विक्री प्रदर्शन आयोजित केले होते. सदर प्रदर्शनात तालुक्यातील बचत गटाच्या होतकरू महिलांनी मोठ्या प्रमाणावर स्टाल लावले होते. जवळपास पाचशे हुन अधिक बचत गटाच्या महिला सहभागी झाल्या होत्या. गेल्या बारा वर्षांपासून महिलांना स्वयव्यावसायिक करण्यासाठी बचत गटाच्या माध्यमातून प्रोस्ताहित करत आहे म्हणून आज तालुका स्तरावर महिला सक्षम झाल्या आहेत.हयाचा मनस्वी आनंद होत आहे असे नक्षत्र संस्थेच्या विभागीय व्यवस्थापक सरोज पाटील व तालुकाध्यक्ष आशाबाई पाटील यांनी प्रास्ताविकातुन सांगितले.
याप्रसंगी चैतन्य संस्था राजगुरुनगर पुणे चे व्यवस्थापकीय विश्वस्त डॉ.सुधाताई कोठारी, आस्थपना विश्वस्त सुरेखा क्षत्रिय, संचालिका कल्पना पंत, सीईओ कौशल्या थिगळे, समन्वयक अनंता मस्करे, माजी आमदार रामकृष्ण तात्या पाटील, नगराध्यक्षा रजनीताई अनिल वानखेडे, गटनेते अनिल वानखेडे, पोलिस उपनिरीक्षक प्रशांत गोरावडे, प्रमिला पाटील, विभागीय व्यवस्थापक सरोज पाटील, तालुकाध्यक्ष आशा पाटील, सचिव सिमा जोशी, खजिनदार चारुशीला बेहेरे, ललिता पाटील, सरला पाटील, राखी ठाकुर, दिपाली पाटील, आदी उपस्थित होते. सदर प्रदर्शनासाठी नक्षत्र संस्थेच्या महिला पदाधिकारी व मनेजर अर्जुन वर्मा, सागर चौधरी, लेखापाल चंद्रकांत चव्हाण, सुनिता पवार, वैशाली बडगुजर, पुनम पवार यासह कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. भव्य व्यावसायिक विक्री प्रदर्शनासाठी तालुक्यातील व शहरातील महिला मोठ्या संख्येने सहभागी होवून प्रदर्शनाचा मनमुराद आनंद लुटला.