आमदारांच्या उपस्थित स्वीकारला नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष पदाचा पदभार
बोदवड (सतीश बावस्कर) बोदवड शहर नगरपंचायतवर शिवसेनेचा भगवा फडकला असून नगराध्यक्षपदी आनंदा पाटील व उपनगराध्यक्षा रेखाताई संजय गायकवाड यांची निवड झालेली आहे. परंतु, जोवर आमदार स्वतः नगरपंचायत येथे उपस्थित राहत नाही तोपर्यंत मी नगराध्यक्ष खुर्ची वर बसणार नाही असे आनंदा पाटील म्हणाले होते.
म्हणून आज आमदार चंद्रकांत पाटील यांनी आनंदा पाटील यांच्या सत्कार करीत नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष रेखाताई संजय गायकवाड पदाचा पदभार स्वीकारल्या प्रमाणे भावी वाटचालीच्या शुभेच्छा दिल्या. तसेच बोदवड तालुक्यातील सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी सदरचे आमची निवड करण्यात आली असून बोदवड शहरातील सर्वांगीण विकास हाच आमचा खरा आता ध्यास बोदवड शहरातील सर्वसामान्य जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी आम्ही कधीही तत्पर आहात, तसेच बोदवड शहरातील व तालुक्यातील शिवसेनेचे पदाधिकारी दिनेश भाऊ माळी व सुनील भाऊ बोरसे व तालुक्यातील सर्व शिवसैनिक उपस्थित होते.