महाराष्ट्रराजकीय
वाईन विक्री बंदी करा भाजपा महिलांची मागणी
धुळे (विक्की आहिरे) शहरातील मुख्य टपाल कार्यालय येथे भाजपा महिला आघाडीच्या वतीने किराणा दुकानात वाईन विक्री निर्णय रद्द करा मागणी करत महाविकास आघाडी सरकारचा निषेध करण्यात आला. २०० पोस्टकार्ड मुख्यमंत्री ठाकरे यांना भाजपा महिला आघाडीच्या मायादेवी परदेशी अल्पा अग्रवाल वैशाली शिरसाठ यांच्या नेतृत्वात पाठविण्यात आले यावेळी मोठ्या संख्येने महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या. निर्णय रद्द न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला आहे