राजकिय पक्षाच्या कुबड्या न घेता अल्पावधीत असंख्य कार्य करण्यासाठी कटिबद्ध असलेली वाल्या सेना !
मालपुर (गोपाल कोळी) वाल्यासेनेतर्फे ज्या वेळेस करोनाच्या काळात भीतीने समाजाचे अनेक नेते, पुढारी, समाजसेवक घरात बसलेले होते. त्यावेळी धुळे नंदूरबार जिल्हातील शेकडो समाज बांधवांना संपुर्ण धुळे नंदूरबार जिल्हातील लोकांसाठी वैद्यकीय मदत, सहायता ,विनामुल्य मदतकार्य सुरू होते. स्वत:च्या जीवाची कुठलीही पर्वा न करता वाल्या सेना च्या वतीने निस्वार्थ पणे गावोगावी समाजप्रबोधन, खावटी योजनेच्या अन्याय संदर्भात आवाज उठवणे सुरू होते. व्यसनमुक्ति, घरकुल योजना निवेदने, मोर्चे यासाठी जिल्हाभरात मोहीम राबविली गेली.
शनिमांडळ प्रकरण, कोरीट प्रकरण, झोतवाडे प्रकरण, जामदा प्रकरण येथे समाजाचे अनेक पुढारी, समाजसेवक कोरोना भीतीने, राजकिय दबावाने, जीवाच्या भीतीने आरामात घरात बसून वाट अप वर घटना पाहून घरात बसून कोरोनायोध्दा पुरस्कार मिळवत होते. त्यावेळी वाल्या सेना चे नवे जुने सर्व कार्यकर्ते मैदानात उतरून समाज बांधवांना धीर देण्याचे, पोलीस स्टेशनला चकरा मारून समाज बांधवाना न्याय मिळवण्यासाठी जीवावर होऊन लढत होते. भल्याभल्यांचे शत्रूत्व घेत होते. तसेच कोरोना काळात दवाखान्यात पोहचून तातडीचे मदतकार्य, मोर्चे, निवेदन, आंदोलन करीत होते.
समाजाला असहायतेच्या दलदलीतून बाहेर काढण्यासाठी निस्वार्थ कार्याची गरज आहे. समाजात राजकारण फुटीर, स्वार्थी, निवडणूक पुर्वी वेळेवर राजकारणाचा ढोल बडवून समाजात राजकारण ची गरज नाही. राजकारण करणा-यांनी केवळ निवडणुकांपुरता समाजाच्या कामांचे देखावे न करता, सोयीचे राजकारण न करता निरंतर कार्य करत रहावे हिच अपेक्षा आहे. समाजबांधव हे सहनशील आहेत त्यांना सर्व काही दिसत आहे.