बोरदसह परिसरात कुलरच्या मागणीत वाढ
बोरद (योगेश गोसावी) तळोदा तालुक्यातील बोरद परिसरात सद्या तापमानाचा पारा चढला असून दुपारी उन्हाचे चटके तीव्र बसू लागले आहेत. त्यामुळे कूलरच्या मागणीत वाढ झाली आहे. त्यामुळे बाजारात लहान मोठे कूलर उपलब्ध झाले असून कूलर खरेदीसाठी नागरिकांची गर्दी पाहायला मिळत आहे.
गेल्या दोन वर्षांपासून कोरोना काळात कुलरचा व्यवसाय पूर्णपणे ठप्प झाला होता. मात्र या वर्षी कूलर व्यवसाय हा रुळावर येत आहे. बाजारात २.५०० हजारा पासून ते १० हजार रु पर्यंत कूलर उपलब्ध झाले आहेत. बोरदसह परिसरात दुपारच्या वेळी उन्हाने लाहीलाही होत असून ३९ ते ४२ सेल्सीअस तापमान जात असून त्यामुळे घरातील पंखे ही गरम हवा देत असल्याने थंड हवेसाठी कूलर खरेदीसाठी नागरिकाचा कल दिसून येत आहे. त्यामुळे एप्रिल ते मे महिन्यात उन्हाचा तडाखा वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे कूलर व्यवसाय तेजीत येणार आहे.
मागील दोन वर्षांपासून कोरोना सारख्या महामारी मुळे कूलर व्यवसाय ठप्प पडला होता. पण या वर्षी मार्च महिन्यातच तापमान वाढ झाली असून कडाक्याचे उन पडत आहे. त्यामळे कुलरच्या मागणीत साहजिकच वाढ झाली आहे. त्यातच २.५०० पासून तर कूलर उपलब्ध असून लहान मोठे कूलर उपलब्ध आहेत.
योगेश पाटील (कूलर व्यवसायिक)
यंदा मार्च महिन्यातच उन पडत असून दुपारी बारा नंतर लाहीलाही होत आहे. घरातील पंखे ही गरम हवा देत असल्याने अशात कूलर घेण्याची गरज पडू लागली आहे. सकाळच्या सत्रात काम करून आल्यानंतर दुपारी मात्र कूलर अती महत्वाचे झाले आहे. त्यातच यंदा कुलरच्या किमती ही वाढल्या आहेत.
विनोद सोनवणे (ग्राहक)