महाराष्ट्र
पळासनेरजवळ ‘द बर्निंग ट्रक’चा थरार !
धुळे (स्वप्निल मराठे) तालुक्यातील पळासनेर गावाजवळ मुंबई-आग्रा महामार्गावर धावत्या ट्रकला अचानक आग लागली. या आगीत सुदैवाने जीवितहानी झाली नसली तरी वाहतूक काही काळ खोळंबली होती.
पळासनेर गावाजवळ महामार्गावर आगीच्या विळख्यात सापडलेला कंटेनर
मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी रात्री ९ वाजेच्या सुमाराला ही घटना घडली. एच. आर. ३८ डब्लू ५१२९ क्रमांकाचा ट्रक शिरपूरकडून सेंधव्याकडे जात होता. ट्रक पळासनेर गावाजवळ आला असता कॅबिनमध्ये अचानक आग लागली. चालकाने प्रसंगावधान राखत ट्रक रस्त्यावरच थांबवून उडी घेतल्याने तो बचावला. अग्नीशमन दलाला याची माहिती देण्यात आली. ट्रक रात्री उशिरापर्यंत जळत होता.