नंदुरबार आगारातर्फे मराठी दिनानिमित्त अभिवादन
नंदुरबार (प्रतिनिधी) राज्य परिवहन महामंडळाच्या नंदुरबार आगारातर्फे मराठी राज्यभाषा दिनानिमित्त ज्येष्ठ कवी कुसुमाग्रज तथा वि. वा. शिरवाडकर यांच्या प्रतिमा पूजनाने साजरा करण्यात आला.
नंदुरबार बस स्थानकावरील उद्घोषणा कक्षा जवळ प्रतिमा पूजन करण्यात आले. याप्रसंगी सेवानिवृत्त प्रा. डॉ. पुष्पा गावित यांच्या हस्ते वि वा शिरवाडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले. यावेळी राज्य परिवहन महामंडळाचे धुळे येथील लेखाधिकारी मिलिंद सांगळे, प्रसारमाध्यम क्षेत्रातील प्रतिनिधी पत्रकार महादू हिरणवाळे, आगार प्रमुख मनोज पवार, स्थानक प्रमुख साहेबराव पाडवी, मालती गावित, सरला काकडे,रमेश वळवी, दिलीप वळवी ,योगेश्वर शिवदे उपस्थित होते. ज्येष्ठ प्रवासी सुरेश भावसार यांच्या हस्ते श्रीफळ वाढविण्यात आले.प्रसंगी प्रा.पुष्पा गावित यांनी वि. वा. शिरवाडकर यांच्या जीवन चरित्राबद्दल माहिती दिली. प्रास्ताविक व सूत्रसंचालन आगारप्रमुख मनोज पवार यांनी केले. मराठी भाषा दिनानिमित्त नंदुरबार बस स्थानकावर आकर्षक रांगोळीने प्रवाशांचे लक्ष वेधले. तसेच बस स्थानकावरील ध्वनिक्षेपकावरून दिवसभर मराठी भक्तीगीते लावण्यात आली होती.