नंदुरबार आगारातून धुळे, नाशिक, जळगावसाठी एसटी बस सुरू
नंदुरबार (प्रतिनिधी) राज्य परिवहन महामंडळाच्या नंदुरबार आगारातून धुळे, नाशिक, जळगाव साठी नियमीत बसेस सुरू करण्यात आले आहेत. प्रवाशांनी या बस सेवेचा लाभ घेण्याचे आवाहन आगारप्रमुख मनोज पवार यांनी केले आहे.
नंदुरबार -धुळे सकाळी 6:30,7:30,9:30,11,11:30, दुपारी 2 आणि 4 चार वाजता सोडण्यात येईल. नंदुरबार- नाशिक सकाळी 6:30, 8,8:30, 9, 9:30, 10, 10:45,11:15, दुपारी 3 वाजता, नंदुरबार -जळगाव सकाळी 6 वाजता, नंदुरबार -शिंदखेडा 10:30,नंदुरबार -शहादा सकाळी10:30,11,12:30, दुपारी 3: 45, नंदुरबार – साक्री सकाळी 8:15,9:15,10, दुपारी 12:15,1:15,3:15, 4, आणि सायंकाळी पाच वाजता नवापूर- चोपडा सकाळी 8,8:45, चोपडा- नवापूर सकाळी5:45, दुपारी 4:30, नंदुरबार- शिरपूर दुपारी 1 आणि चार वाजेला सोडण्यात येणार आहे. चोपडा- सुरत सकाळी 9:30, आणि सुरत -चोपडा सकाळी 9 वाजता सोडण्यात येईल. सध्या नंदुरबार आगारात एकूण 14 चालक कार्यरत असून अजून वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नंदुरबार आगारातून नियमित बस सुरू होतील. प्रवाशांनी लाभ घेण्याचे आवाहन नंदुरबार आगार प्रमुख मनोज पवार यांनी केले आहे.