महाराष्ट्रराजकीय
वैजापूर नगराध्यक्ष शिल्पाताई परदेशी यांनी दिलेलं आश्वासन केलं पूर्ण ; मंजूर केलेल्या रस्त्यांच्या कामाला झाली सुरुवात
वैजापूर (अशोक पवार) वैजापूर तालुक्यातील लाडक्या नगराध्यक्ष शिल्पाताई दिनेश प्रदेश यांनी सभेमध्ये भाषण करत असताना प्रभाग क्रमांक 8 मधील मुख्य रस्ता मी पुर्ण करीन असे आश्वासन दिले होते. आता त्यांनी रस्ता मंजूर केला असून धरणग्रस्त नगर, बन्सीलाल नगर, जोरे वस्ती रोडचे काम सुरू करण्यात आले आहे.
वैजापूर नगर नगराध्यक्ष शिल्पाताई दिनेश परदेशी व उपनगराध्यक्ष साबेर, नगरसेविका लताताई अंकुशराव मगर, नगरसेवक गणेश खैरे, नगरसेवक बजरंग मगर, नगरसेवक गोकुळ भुजबळ, नगरसेवक बंडू पाटील वाणी, नगरसेवक ज्ञानेश्वर अण्णा ठेके, नगरसेवक पारस घाटे व जोरे बाबा रामेश्वर तात्या गायकवाड, नितीन वाघ, राजू महाजन व इतर नागरिक उपस्थित होते.